अयोध्या ( उत्तरप्रदेश ) - शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शक्ती आणि भक्ती हे दोन्ही एकच, भक्ती हीच आमची शक्ती आहे. असे तर उत्तर भारतीयांच्या प्रश्नांवर आदित्य म्हणाले, मी आमच्या बद्दल सांगू शकतो अन्य पक्षांबद्दल मी बोलू शकत नाही. ( Aaditya Thackeray In Ayodhya )
मुंबईहून सकाळीच विमानाने आदित्य ठाकरे हे उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये दाखल झाले होते. यावेळी विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. तेथून ते अयोद्धेकडे रवाना झाले. अयोद्धेत त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले व त्यांनतर पत्रकारांशी संवाद साधला.
शिवसेनेला शक्तीप्रदर्शनाची आवश्यकता नाही - पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, उत्तरप्रदेशात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी स्वागत केले. त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. शिवसेनेना ही उत्तरदेशात शक्ती प्रदर्शनासाठी आलेली नाही, तर शिवसेनेची शक्ती आणि भक्ती या दोन्ही एकच आहेत. आमची भक्ती हीच शक्ती आहे. त्यामुळे आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची काही गरज नाही.
हेही वाचा - Aaditya Thackeray Live Updates : आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल.. इस्कॉन मंदिरात घेतले दर्शन