ETV Bharat / bharat

Several Deaths in Howrah Due to Hooch:पश्चिम बंगालच्या हावडामधील घुसुरीत विषारी दारु पिल्‍याने 9 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - विषारी दारु पिल्‍याने 9 जणांचा मृत्यू

हावडामधील घुसुरीत विषारी दारु पिल्‍याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे (Severe Deaths in Howrah Due to Hooch). अनेकजण आजारी असून रुग्णालयात दाखल आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालच्या हावडामधील घुसुरीत विषारी दारु पिल्‍याने 9 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 20, 2022, 12:49 PM IST

हावडा: बर्दवानपाठोपाठ हावडामध्ये विषारी दारुमुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हावडा येथील घुसरी येथील मालीपंचघा पोलीस स्टेशन हद्दीतील गजानंद बस्ती येथे ही घटना घडली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. सदर झोपडपट्टीत दारू पिऊन अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेकांना त्रास होत आहे. (Several Died After Consuming Hooch in Howrah). मात्र, पोलीस प्रशासनाला न कळवता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

मद्यपान केल्यानंतर अनेक लोकांना त्रास - स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यपान केल्यानंतर अनेक लोकांना त्रास होऊ लागला. त्यापैकी काही घरीच उपचार घेत आहेत. इतरांच्यावर खासगी नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत. विषारी दारू पिऊन त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो औद्योगिक परिसर आहे. अनेक छोटे कारखाने या परिसरात आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याचे कामगार दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी माळीपंचघर पोलीस ठाण्यामागील रेल्वे लाईनजवळ दारू पिण्यासाठी थांबले. प्रताप कर्माकर नावाचा व्यक्ती दारूभट्टी चालवत असे.

न सांगता मृतदेहावर अंत्यसंस्कार - विषारी दारू पिल्याने लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, अनेक कुटुंबांमध्ये अधिकाऱ्यांना न सांगता मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले. याशिवाय, अनेक लोक घरीच उपचार घेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, काहींना स्थानिक टीएल जयस्वाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर हावडा शहर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार त्रिपाठी झोपडपट्टीत आले, त्यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

प्रकरणाची गंभीर दखल - पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. हावडा शहर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत सहभागी असलेल्या कोणालाही सोडणार नाही, असे ते म्हणाले. काल रात्री दारू प्यायल्यानंतर सर्वजण एक एक करून आजारी पडू लागले. जसजशी रात्र होत गेली, तसतसे काही लोकांचा झोपेतच मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात शोककळा पसरल्याचे दिसून येत आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.