नवी दिल्ली - देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Hike) दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष दिले आहे. केंद्राने शनिवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उपाययोजना करण्याच्या सूचना देत आढावा घेतला. तसेच तात्पुरती रुग्णालये स्थापन (Makeshift Hospitals) करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यास सांगितले. होम आयसोलेशनमधील (Home Isolation) रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यासही केंद्राने सांगितले आहे.
- केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र -
कोरोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधांची उपलब्धता वाढवण्यासाठी तात्पुरती रुग्णालयांची निर्मिती सुरू करण्याचा सल्ला केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिला आहे. DRDO आणि CSIR तसेच खासगी संस्था यांच्या समन्वयाने ही रुग्णालये आणि उपाययोजना केल्या जाऊ शकतात. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे.
- उपाययोजना कऱण्याच्या सर्व राज्यांना सूचना -
कोरोना रुग्णसंख्या वाढ पाहता राज्यांना क्वारंटाईनची सोय करावी, रुग्णालये कमी पडत असतील कर तात्पुरती रुग्णालयांची निर्मिती करावी. तसेच जागा कमी पडत असतील तर हॉटेल रुमदेखील बूक कराव्यात, तसेच जिल्ह्यांमध्ये यासर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करावे, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत. तसेच जिल्हा, तालुकानिहाय कॉल सेंटर सुरू करणे, होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांच्या मॉनिटरिंगसाठी खास पथक तयार करणे, त्या त्या भागातील बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन याबाबतची उपलब्धतेची माहिती वारंवार देण्याबाबतही सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत.