ETV Bharat / bharat

Share Market Update: मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात १७५ अंशांची घसरण - मुंबई शेअर बाजार अपडेट

इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स (equity benchmark sensex) गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात 175 अंकांपेक्षा अधिक घसरला. मॅक्रो इकॉनॉमिक संकेतांच्या कमजोरीचा (weak macroeconomic cues) आयटी, बँकिंग आणि वित्तीय समभागांनी मागोवा घेतला आहे.

Share Market Update
Share Market Update
author img

By

Published : Oct 13, 2022, 10:59 AM IST

मुंबई: मुंबई शेअर बाजारात (equity benchmark sensex) गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात 175 अंकांपेक्षा अधिक घसरण झाली. अर्थव्यवस्थेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याची चिन्हे असल्याने (weak macroeconomic cues) आयटी, बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरवर परिणाम झाला. याशिवाय सतत विदेशी भांडवलाचा ओघ आणि जागतिक समभागांमध्ये झालेली विक्री याचाही गुंतवणूकदारांच्या निवडीवर परिणाम झाला, असे बाजार विश्वलेषकांनी सांगितले.

मुंबई शेअर बाजारात सुरुवातीच्या सौद्यांमध्ये निर्देशांक 179.48 अंशात 0.31 टक्क्यांनी घसरून 57,446.43 वर पोहोचला. एनएसई निफ्टी 35.65 अंशांनी घसरून 17,087.95 वर आला.

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले सेन्सेक्स पॅकमध्ये विप्रोच्या शेअरमध्ये सर्वाधिक 5.20 टक्क्यांनी घसरण झाली. त्यानंतर एचडीएफसी ट्विन्स, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक बँक यांचा क्रमांक लागतो. विप्रो लिमिटेडने सप्टेंबर तिमाहीच्या निव्वळ नफ्यात 9.3 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. कर्मचार्‍यांच्या वाढत्या खर्चामुळे ही घसरण झाली आहे. एचसीएल टेकने सप्टेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक 7 टक्क्यांची वाढ नोंदवल्यानंतर त्यांच्या नफ्यात 3.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एम & एम, टाटा स्टील, डॉ. रेड्डीज्, इंडसलॅंड बॅंक आणि एनटीपीसी यांनाही फायदा झाला आहे.

अशी आहे देशातील आर्थिक स्थिती भारतात अन्नधान्याच्या उच्च किमतींनी किरकोळ चलनवाढीचा दर पाच महिन्यांच्या उच्चांकी 7.4 टक्क्यांवर नेला, तर कारखाना उत्पादन 18 महिन्यांत प्रथमच घसरले. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित चलनवाढीमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाल्याने रिझर्व्ह बँकेवर (RBI) उच्च किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा व्याजदर वाढवण्याचा दबाव वाढेल. मागील सत्रात बीएसई सेन्सेक्स 478.59 अंकांनी म्हणजेच 0.84 टक्क्यांनी वाढून 57,625.91 वर स्थिरावला. तर व्यापक NSE निफ्टीने 140.05 अंक म्हणजेच 0.82 टक्क्यांनी उडी मारून 17,100 ची पातळी पुन्हा मिळवली आणि 17,123.60 वर बंद झाला.

जगभरात कशी आहे शेअर बाजाराची स्थिती? एक्सचेंज डेटानुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) बुधवारी भारतीय भांडवली बाजारात निव्वळ विक्रेते म्हणून राहिले कारण त्यांनी 542.36 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.04 टक्क्यांनी घसरून USD 92.41 प्रति बॅरलवर व्यापार करत आहे. आशियाई बाजारांमध्ये टोकियो, शांघाय, हाँगकाँग आणि सोलमधील शेअर्स मध्य सत्रातील सौद्यांमध्ये तोट्याने व्यवहार करत होते. तर वॉल स्ट्रीटवरील समभाग रात्रभराच्या सत्रात लक्षणीय घटले. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) ऑगस्टमध्ये 0.8 टक्क्यांनी घसरला. मुसळधार पावसामुळे बांधकाम आणि विजेची मागणी कमी झाली आहे, त्यामुळे या क्षेत्रात सुद्धा उदासीनता पहायाला मिळाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.