नवी दिल्ली : राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या (Rouse Avenue Court) वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांचा महिला कर्मचाऱ्यासोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना निलंबित केले. (judicial officer of Rouse Avenue Court suspended). हा व्हिडिओ न्यायिक अधिकाऱ्यांच्या केबिन मधील आहे. तेथे ते महिला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत.
चौकशी करण्याच्या सूचना : मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मार्च महिन्याचा आहे. मात्र, सोमवारी हा व्हिडिओ प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्ली उच्च न्यायालयाला या प्रकरणाबाबत सूचना दिली. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने सूचनांवर स्वतःहून कार्यवाही सुरू केली. न्यायालयाने बुधवारी या वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्याला निलंबित केले. त्याचबरोबर त्यांच्याविरोधात चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अधिकार्याकडे दीर्घ न्यायालयीन रेकॉर्ड : व्हायरल व्हिडिओ प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या न्यायिक अधिकार्याकडे दीर्घ न्यायालयीन रेकॉर्ड आहे. त्यांनी दिल्लीतील विविध जिल्हा न्यायालयात सत्र न्यायाधीश म्हणून काम केले आहे. यापूर्वी ते रोहिणी न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.