ETV Bharat / bharat

Delhi Crime : सेवानिवृत्त एमसीडी इंजिनिअरची हत्या, फ्रीडम फायटर कॉलनीतील घटना - मारेकऱ्याचा शोध सुरु

दिल्लीतील पॉश कॉलनी फ्रीडम फायटर येथे काही गुन्हेगारांनी एका वृद्धाची निर्घृण हत्या केली असल्याची घटना पुढे आली आहे. मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

Delhi Crime
Delhi Crime
author img

By

Published : Feb 22, 2023, 6:07 PM IST

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे सैनिक फार्म भागातील, फ्रीडम फायटर कॉलनीत एका 75 वर्षीय अभियंत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी अभियंत्याच्या घरी लूटमार केली. यादरम्यान त्याने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता, सराईत गुन्हेगारांनी त्याची हत्या केली. दिल्ली पोलिसांना याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या या प्रकरणी फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून; या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Delhi Crime
सेवानिवृत्त एमसीडी इंजिनिअरची हत्या

शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती : दक्षिण जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9:30 वाजता माहिती मिळाली की, फ्रीडम फायटर कॉलनीच्या A1 ब्लॉकमध्ये राहणारे 75 वर्षीय सतीश भारद्वाज यांच्या घरात सामान विखुरलेले आहे आणि घरातील सामानात ते मृतावस्थेत पडले आहेत. भारद्वाज यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली असता, मृत भारद्वाज यांच्या घरातील सामान विखुरल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याचवेळी, प्राथमिक तपासात दरोड्याच्या उद्देशाने वृद्धाची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांना वाटत आहे. सध्या पोलीस पथक आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहे, जेणेकरून मारेकऱ्याचा काही सुगावा लागू शकेल.

Delhi Crime
सेवानिवृत्त एमसीडी इंजिनिअरची हत्या

मृताची कौटूंबिक माहिती : वृद्धाची हत्या कशी झाली आणि घरातून चोरटे कोणकोणत्या वस्तू घेऊन गेले हे पोलीस तपासानंतरच समजेल. त्याचवेळी, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, सतीश भारद्वाज हे त्यांच्या घरात एकटेच राहत होते. दिल्ली महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता पदावरून ते निवृत्त झाले. त्यांना दोन मुले असून एक मुलगा परदेशात आहे, तर दुसरा लष्करात अधिकारी आहे. त्यांना वैशाली नावाची एक मुलगी देखील आहे, जी गाझियाबाद येथे राहते. शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते.

दिवसें दिवस तरुणांचा कल परदेशात राहण्याकडे वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक घरी ज्येष्ठ नागरिकांचे एकटे राहण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. याचाच शोध दरोडेखोर घेत असतात. आणि योग्य ती वेळ साधुन दरोडा टाकतात; दरम्यान विरोध करणाऱ्या व्यक्तींची हत्या केली जाते. दिवसेंदिवस अश्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने, ही चिंतेची बाब बनली आहे.

हेही वाचा : Thane Murder : शिवीगाळ केल्याच्या रागातून ३५ वर्षीय तरुणाचा खून; दोन्ही आरोपी १२ तासातच गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.