ETV Bharat / bharat

PM Modi Security Lapse in Hubballi : पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान सुरक्षेत मोठी चूक; बळजबरीने हार घालण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज कर्नाटकातील हुबळी येथे रोड शो होता. मात्र या रोड शो दरम्यान त्यांच्या सुरक्षेत गलथानपणाचा प्रकार समोर आला आहे. यावेळी एका तरुणाने बॅरिकेड ओलांडून मोदींना हार घालण्याचा प्रयत्न केला.

Security Lapse In Modi Road Show
मोदींच्या रोड शो दरम्यान सुरक्षेत त्रुटी
author img

By

Published : Jan 12, 2023, 5:17 PM IST

Updated : Jan 12, 2023, 7:26 PM IST

मोदींच्या रोड शो दरम्यान सुरक्षेत चूक

हुबळी (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुबळी येथील रोड शोदरम्यान सुरक्षेत त्रुटीचा प्रकार समोर आला आहे. यावेळी एका तरुणाने बॅरिकेडवरून उडी मारून मोदींच्या गाडीत घुसून मोदींना पुष्पहार घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तरुणाला ओढून नेले. तरुणाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

पंतप्रधानांचा रोड शो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी हुबळी येथे रोड शो केला. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त रेल्वे क्रीडा मैदानावर राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी आले आहेत. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगा लावलेल्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. रॅली दरम्यान 'मोदी, मोदी' आणि 'भारत माता की जय'चे नारे सर्वत्र दिल्या जात होते. तर काही ठिकाणी लोकांनी पंतप्रधानांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. भाजपशासित कर्नाटकात मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

हुबळीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन : पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, राष्ट्रीय युवा महोत्सव दरवर्षी प्रतिभावान तरुणांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आणि त्यांना राष्ट्र उभारणीकडे वळवण्यासाठी आयोजित केला जातो. हा महोत्सव देशाच्या सर्व भागांतील विविध संस्कृतींना एका समान व्यासपीठावर आणतो. यंदा हा महोत्सव कर्नाटकातील हुबळी-धारवाड येथे १२ ते १६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या महोत्सवाची थीम 'विक्षित युवा - विकसित भारत' अशी आहे.

फेस्टिव्हलमध्ये यूथ समिटचे आयोजन : या फेस्टिव्हलमध्ये यूथ समिट पाहायला मिळेल, ज्यामध्ये G20 आणि Y20 इव्हेंटमधून उद्भवलेल्या पाच थीमवर चर्चा होईल. या समिटमध्ये साठहून अधिक नामवंत तज्ज्ञांचा सहभाग असेल. तसेच अनेक स्पर्धात्मक आणि बिगर स्पर्धात्मक कार्यक्रमही आयोजित केले जातील. स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये लोकनृत्य आणि गाणी यांचा समावेश असेल आणि स्थानिक पारंपारिक संस्कृतींना चालना देण्यासाठी ते आयोजित केले जातील. गैर-स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये योगाथॉनचा समावेश असेल ज्याचे उद्दिष्ट सुमारे 10 लाख लोकांना योगासने करण्यासाठी एकत्रित करण्याचे आहे. आठ स्वदेशी खेळ आणि मार्शल आर्ट्स देखील असतील. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील कलाकारांद्वारे सादरीकरण केले जाईल. इतर आकर्षणांमध्ये फूड फेस्टिव्हल, यंग आर्टिस्ट कॅम्प, साहसी क्रीडा उपक्रम, विशेष नो युवर आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स कॅम्प इत्यादींचा समावेश आहे.

हेही वाचा : Airport on High Alert: पंतप्रधान मोदी जाणाऱ्या रस्त्यावर सापडली अनोळखी कार.. विमानतळावर 'हाय अलर्ट' जारी

Last Updated : Jan 12, 2023, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.