ETV Bharat / bharat

Goa Congress Candidate Second List : गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

author img

By

Published : Jan 9, 2022, 10:09 PM IST

Updated : Jan 9, 2022, 10:56 PM IST

गोव्यात विधानसभेची निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) जवळ येत असताना राजकीय पक्षांच्या उमेदवारांची घोषणा ( Candidate List For Goa Assembly Election ) होऊ लागली आहे. काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली ( Goa Congress Candidate Second List ) आहे. या यादीत ७ जणांचा समावेश आहे.

गोवा विधानसभा निवडणुक
गोवा विधानसभा निवडणुक यादी

पणजी : गोवा विधानसभेच्या निवडणुकीची ( Goa Assembly Election 2022 ) तारीख घोषित होताच सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली ( Candidate List For Goa Assembly Election ) आहे. काँग्रेसने आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली ( Goa Congress Candidate Second List ) असून, यात सात उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यापूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 10 उमेदवारांना स्थान देण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा घोषित करण्यात आलेल्या यादीत 7 जणांचा समावेश आहे.

उमेदवार यादी पुढीलप्रमाणे

पेडणे - जितेंद्र गावकर
सांताक्रूझ- हृदल्फ फर्नांडिस
कुंभारजुवे - राजेश फलदेसाई
वाळपाई- मनीषा शेणवी उसगावकर
दाबोलीम- कॅप्टन विरीअंतो फर्नांडिस
कोर्टालीम- ओलांसिओ सायमन
न्हावेलिम- आवेरतानो फूरतादो

काँग्रेस अजूनही संभ्रमात

दरम्यान, मागच्या दोन दिवसांपासून राज्यात भाजपला रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन टीम गोवा स्थापन करण्याचे ठरविलं होते. त्यात काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी अनुकूलता दर्शवत आपण तयार असल्याने सांगितले होते. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती आणि काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा अंतर्गत नेत्यांचा कलह पाहता राज्यात सध्यातरी भाजपला रोखण्यासाठी टीम गोवा स्थापन करणे शक्य नसल्याचे बोलले जाते. त्यातच काँग्रेस उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केल्याने अंतर्गत आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Last Updated : Jan 9, 2022, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.