भुवनेश्वर (ओडिशा) : केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचा धोका वाढत आहे. नुकताच कोझिकोडमध्ये दोन जणांचा निपाहमुळे मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्याच्या आरोग्य यंत्रेणाला अलर्ट मोडवर ठेवलं आहे. कोझिकोडमध्ये प्रशासनानं नागरिकांना मास्क लावण्याचा सल्ला दिला. त्या पाठोपाठ आता ओडिशामध्ये स्क्रब टायफस आजारानं डोकं वर काढलं आहे.
बारगढ जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू : केरळनंतर आता ओडिशामध्ये दुसऱ्या एका रोगाच्या प्रसारानं खळबळ उडाली आहे. ओडिशातील बारगढ जिल्ह्यात नुकतेच स्क्रब टायफस आणि लेप्टोस्पायरोसिसमुळे पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी राज्यात या रोगाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं सर्व प्रमुख जिल्हा वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी, कॅपिटल हॉस्पिटल भुवनेश्वरचे संचालक आणि आरजीए तसेच राउरकेलाचे संचालक यांना हे निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागानं निवेदन केलं जारी : गुरुवारी ओडिशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं एक अधिकृत निवेदन जारी केलं. 'राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधून स्क्रब टायफस आणि लेप्टोस्पायरोसिसची प्रकरणं नोंदवली जात आहेत. याचा वेळेवर प्रतिबंध आणि व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. त्याच्या निदानासाठी निरीक्षण प्रणाली मजबूत करावी', असं या निवेदनात म्हटलं आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निर्देश : याशिवाय आरोग्य विभागानं जिल्हा आरोग्य अधिकार्यांना डीपीएचएलमध्ये आवश्यक चाचणी कीटची खरेदी आणि पुरवठा करुन चाचण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे. यासह विभागानं अधिकाऱ्यांना योग्य प्रतिजैविक आणि औषधांचा पुरेसा साठा वापरण्यास सांगितलं आहे. 'या आजारांमुळे होणाऱ्या सर्व मृत्यूंची चौकशी करण्यात यावी. तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजले जावेत. अशा रोगांशी संबंधित डेटा SSU सोबत विहित नमुन्यात नियमितपणे शेअर केला जावा', असे निर्देश आरोग्य विभागानं विविध जिल्ह्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
स्क्रब टायफस कशामुळे होतो : स्क्रब टायफस, ज्याला बुश टायफस असंही म्हणतात, हा 'ओरिएंटिया सुत्सुगामुशी' नावाच्या जीवाणूमुळे होणारा रोग आहे. स्क्रब टायफस हा रोग संक्रमित चिगर्स (लार्व्हा माइट्स) चावल्यानं लोकांमध्ये पसरतो.
हेही वाचा :