ETV Bharat / bharat

दिल्ली, बंगाल, तामिळनाडूमधील Schools Closed.. शाळा बंद असणाऱ्या राज्यांची संपूर्ण यादी

author img

By

Published : Jan 3, 2022, 6:58 PM IST

Updated : Jan 3, 2022, 9:35 PM IST

कोरोनासोबत ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद (Mumbai Schools Closed ) ठेवण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. महाराष्ट्रातील शाळा सुरु ठेवण्याबाबतही राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. देशातील (Owing to the rise in Omicron cases across India)अनेक राज्यात कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे उत्तरप्रदेश, दिल्ली व बंगालसह तामिळनाडू सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

school-close
school-close

नवी दिल्ली - कोरोनासोबत ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद (Mumbai Schools Closed ) ठेवण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. महाराष्ट्रातील शाळा सुरु ठेवण्याबाबतही राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. देशातील अनेक राज्यात कोरोनाचा प्रसार (Owing to the rise in Omicron cases across India) वाढल्यामुळे उत्तरप्रदेश, दिल्ली व बंगालसह तामिळनाडू सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (New guidelines for corona) जाणून घेऊयात कोण-कोणत्या राज्यातील शाळा बंद आहेत.

कोरोना व ओमायक्रॉन संसर्गामुळे बंगालमधील शाळा बंद -

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून, त्यामुळे तेथील राज्य सरकारने तातडीने अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. बंगालमध्ये आज ३ जानेवारीपासून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढलेल्या दिल्ली, मुंबईहून पश्चिम बंगालला आठवड्यातून केवळ दोन दिवसच विमानसेवेस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परवानगी दिली आहे. विमानसेवेबाबतचा आदेश उद्यापासून ( मंगळवार) अंमलात येईल.

दिल्लीतील शाळाही बंद -

राष्ट्रीय राजधानीत दोन आठवड्यांत ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये 2-3 टक्क्यांवरून 25-30 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यानंतर दिल्ली सरकारने 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे. त्यानंतर लगेचच, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवाव्या लागल्या. तसेच, सरकारने पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

यूपीमध्येही शाळांना हिवाळी सुट्ट्या -

नोएडा, गाझियाबाद, हापूर आणि ग्रेटर नोएडामधील ओमायक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ आणि थंडीच्या लाटेमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने इयत्ता 8 वी पर्यंतच्या सरकारी शाळांमध्ये हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. शाळा 31 डिसेंबर 2021 ते 14 जानेवारी 2022 पर्यंत 15 दिवस बंद राहणार आहेत. मात्र, खाजगी शाळांसाठी कोणतीही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली नाही.

हरियाणामध्येही 12 जानेवारीपर्यंत शाळा बंद -

ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये तीव्र वाढ पाहिल्यानंतर, राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यासह नवीन निर्बंध जाहीर केले. या सूचनेनुसार, राज्य सरकारने शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली असून ती १२ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे.

राजस्थान -

राजस्थानमध्ये कोरोना व ओमायक्रॉन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जयपूरमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. राजस्थान सरकारने राज्याची राजधानी जयपूरमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे जयपूरमध्ये 3 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान इयत्ता 1 ते 8 च्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आठवीच्या पुढच्या वर्गासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

ओडिशा -

ओडिशा राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या शाळा पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश देण्याच आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या 1 ते 5 वीच्या शाळा 3 जानेवारी 2022 पासून सुरू होणार होत्या. मात्र कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे ते बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, 6 ते 10 च्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु राहणार आहेत.

तामिळनाडू -

वाढत्या COVID आणि Omicron प्रकरणांमुळे तामिळनाडू सरकारने नवीन आदेश जारी केल्यामुळे तामिळनाडूतील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तामिळनाडूमध्ये 10 जानेवारी 2022 पर्यंत इयत्ता 1 ते 8 वी पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत आणि इयत्ता 9 ते 12 आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे सुधारित करण्यात आली आहेत.

गुजरात व केरळ -

गुजरात व केरळ राज्यांमध्येही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारांनी पुन्हा ऑनलाईन शिक्षणाचे आदेश दिले आहेत. दोन्ही राज्यात नववी ते 12 व महाविद्यालयीन वर्ग सुरु आहेत. मात्र शाळा बंद करण्याचा व पुन्हा ऑनलाईन वर्ग सुरू करण्याच दबाव राज्य सरकारांवर वाढत आहे.

महाराष्ट्र -

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोना व नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच मुंबईतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा (Mumbai Schools Closed) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी आहे. मुंबईतील 1 ली ते 8 वी च्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद (Mumbai Schools Closed ) ठेवण्यात येणार आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

झारखंड -

झारखंडमध्ये कोरोना व नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर करत राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना 15 जानेवारीपर्यंत सुट्टी दिली आहे.

Last Updated : Jan 3, 2022, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.