ETV Bharat / bharat

SBI FOUNDATION DAY : स्टेट बँक ऑफ इंडियाला 215 वर्ष पूर्ण; जाणून घ्या इतिहास! - Interesting Facts About sbi

बँकांच्या विकासासोबतच देशाचा विकास घडून येतो. त्यादृष्टीने भारतीय बँकांचा प्रवास व विकास कसा झाला हे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाविषयी जाणून घेऊया....

स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया
author img

By

Published : Jul 1, 2021, 9:55 AM IST

नवी दिल्ली - कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत बँक ही महत्त्वाची संस्था असते. एखाद-दुसऱ्या दिवसासाठी जरी बँकांचे व्यवहार बंद राहिले, तरी देशाची आर्थिक व्यवस्था खीळ घातल्यासारखी होते. देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या देशातील बँकांचा फार मोठा सहभाग असतो. बँकांच्या विकासासोबतच देशाचा विकास घडून येतो. त्यादृष्टीने भारतीय बँकांचा प्रवास व विकास कसा झाला हे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाविषयी जाणून घेऊया....

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात विश्वासार्ह बँक कोणती? या प्रश्नाला भारतीय स्टेट बँक हे उत्तर येतं. स्टेट बँक ऑफ इंडियाला 200 वर्षांहून अधिक दिवस झाले आहेत. आज ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. मात्र, इथंपर्यंत पोहोचण्याची ब‌‌ँकेची कहाणी खूप रंजक आहे. आज 1 जुलै हा या बँकेचा स्थापना दिवस आहे. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक आहे.

भारतीय स्टेट बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेला हे नाव 1955 मध्ये मिळाले. परंतु आज बँक ज्या शिखरावर पोहचली आहे. याचा प्रवास 2 शतकाहून अधिक जुना आहे. या बँकेच्या स्थापनेचा प्रवास 1806 सालापासून सुरू होतो.

बँक ऑफ कलकत्ता 2 जून 1806 रोजी सुरू झाली होती. तीचे 2 जानेवारी 1809 रोजी बँक ऑफ बंगालमध्ये रुपातंर झाले. 15 एप्रिल 1840 रोजी बँक ऑफ बॉम्बे आणि 1 जुलै 1843 रोजी बँक ऑफ मद्रासची स्थापना झाली. बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या त्या काळातील प्रमुख बँका होत्या.

बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास यांचे 27 जानेवारी 1921 रोजी बँक ऑफ बंगालमध्ये विलीनीकरण झाले. तीन्ही बँका मिळून इंपीरियल बँक ऑफ इंडिया तयार करण्यात आली.

देश स्वतंत्र झाल्याच्या सुमारे 8 वर्षांनंतर भारतीय स्टेट बँक अॅक्ट 1955 अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेने इंपीरियल बँक ऑफ इंडिया ताब्यात घेतली. यानंतर इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलले आणि 1 जुलै 1955 रोजी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली.

1960 मध्ये एसबीआयने 7 बँकांचे नियंत्रण संपादन केले. या सर्व पूर्वीच्या वेगवेगळ्या राज्यांच्या बँका होत्या. ज्याचे नाव आणि लोगो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धर्तीवर ठेवले. या सहयोगी बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अॅण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ इंदूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर यांचा समावेश आहे. 1 एप्रिल 2017 रोजी या बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाल्या.

एसबीआयच्या लोगोविषयी...

1955 साली जेव्हा भारतीय स्टेट बँक अस्तित्वात आली. तेव्हा बँकेचा लोगो वटवृक्षाचे झाड होते. मात्र, 1970 मध्ये हा लोगो पूर्णपणे बदलण्यात आला. वटवृक्षाऐवजी, निळ्या रंगाचे वर्तुळ, ज्याच्या तळाशी एक लहान कट आहे, असा लोगो तयार करण्यात आला. हा लोगो अहमदाबाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या माजी विद्यार्थी असलेले शेखर कामत यांनी तयार केला होता. एसबीआयच्या नव्या लोगोची रचना ही गुजरातमधील कांकरिया तलावापासून प्रेरित असल्याचे काही जणांनी म्हटलं होते. एसबीआयचा लोगो हा कांकरिया तलावाचा नकाशाप्रमाणे असल्याचे काही जणांचे म्हणणे होते. मात्र, हे शेखर कामत यांनी हे नाकारले.

स्टेट बँक ऑफ इंडियाविषयी रोचक तथ्य -

  1. आज बँकेला 215 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापेक्षा जुनी आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली झाली होती. तर त्याच्याही 130 वर्षांपूर्वी बँक ऑफ कलकत्ता अस्तित्त्वात आली होती. जी आज जगात भारतीय स्टेट बँक म्हणून ओळखली जाते.
  2. 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत एसबीआयचे एकूण उत्पन्न, 76,027.51 कोटी रुपये होते. तर 2018-19 च्या याच तिमाहीत 75,670.5 कोटी रुपये होते. 2019-20 च्या मार्च तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 3,580.81 कोटी होता.
  3. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबईत आहे. आज या बँकेचे 44 कोटीहून अधिक ग्राहक आहेत आणि एक चतुर्थांश मार्केट शेअरसह ही देशातील सर्वात मोठी बँक आहे.
  4. अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला अध्यक्ष होत्या. 7 ऑक्टोबर 2013 ते 6 ऑक्टोबर 2017 पर्यंत त्यांनी पद सांभाळले. सन 2015 मध्ये, त्यांना फोर्ब्स मासिकाच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समाविष्ट केले गेले होते.
  5. एसबीआयच्या देशभरात 22,141 शाखा आणि 58,500 हून अधिक एटीएम आहेत.
  6. या बँकेत जवळपास 2.50 लाख कर्मचारी आहेत.
  7. भारतीय स्टेट बँक ही जगातील सर्वात मोठी बँक आहे.
  8. एसबीआयचीही 32 देशांमध्ये 233 कार्यालये आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.