ETV Bharat / bharat

DALBIR KAUR DIED: सरबजीत सिंग यांच्या बहिणीचे निधन; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Randeep Hooda gave shoulder

सरबजीत सिंग यांच्या बहिणीचे म्हणजे दलबीर कौर यांचे निधन ( SARABJIT SINGH SISTER DALBIR KAUR DIED ) झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण सांगितले जात आहे. दलवीर कौर या 60 वर्षांच्या होत्या. शनिवारी रात्री उशिरा पंजाबमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी पंजाबमधील भिखीविंड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

dalbir kaur
dalbir kaur
author img

By

Published : Jun 27, 2022, 4:03 PM IST

मुंबईः हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये (1991) रोजी अटक करण्यात आलेल्या सरबजीत सिंग यांच्या बहिणीचे म्हणजे दलबीर कौर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण सांगितले जात आहे. दलवीर कौर या 60 वर्षांच्या होत्या. शनिवारी रात्री उशिरा पंजाबमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी पंजाबमधील भिखीविंड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला ( Randeep Hooda gave shoulder ) . सरबजीत चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दलबीर कौर यांनी रणदीपला मृत्यूनंतर पार्थिवाला 'खांदा' देण्याचे वचन मागितले होते. ते रणदीप हुड्डा यांनी पूर्ण केले. सरबजीत सिंग यांना पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली तुरूंगात टाकण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर अनेक खोटे आरोप करण्यात आले होते. सरबजीत सिंग यांच्या सुटकेसाठी बहिण दलबीर कौर यांनी दीर्घकाळ लढा दिला ( Dalbir Kaur fought for Sarabjit Singhs release ) होता.

हेही वाचा - आलिया भट्टने दिली 'गुड न्यूज', "कुणी तरी येणार येणार गं!"

३० ऑगस्ट १९९० रोजी सरबजीत सिंग यांनी चुकून पाकिस्तान-भारत यांच्यातली सीमा ओलांडली ( Sarabjit crossed Pakistan-India border ) होती. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांच्यावर हेरगिरीचा ठपका लावला आणि १९९१ मध्ये पाकिस्तानी कोर्टाने सरबजीत सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्याशिवाय लाहोर आणि फैसलाबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप ही आरोप त्यांच्यावर करण्याच आला होता. सरबजीतची बहीण दलवीर कौरने त्याच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले. पण, सर्व प्रयत्न अपयशी ठरले. कारागृहात कैद्यांनी सरबजीतवर हल्ला केला, आणि यात २०१३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. दलबीर कौर यांनी आपल्या भावाच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली होती. सरबजीतने पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे 5 वेळा दयेचा अर्ज दाखल केला होता, जो 5 वेळा फेटाळण्यात आला.

दरम्यान, सरबजीत सिंग यांच्या आयुष्याचा शेवट दुःखद झाला. पाकिस्तानात तुरूंगवासाच्या काळात अनेक वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या. 2016मध्ये त्यांच्या आयुष्यावर बायोपिक चित्रपटही तयार करण्यात आला. ज्यात रणदीपने सरबजीतची भूमिका केली होती आणि ऐश्वर्या राय बच्चनने दलबीर कौरची भूमिका केली होती.

हेही वाचा - LGBT च्या जीवनावर आधारित आवर्जून पाहावेत असे १० चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.