मेष -हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र पद्धतीचा राहणार आहे. प्रेमसंबंधात चढ-उतार जाणवणार आहेत. वैवाहिक जीवनात कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. कोणतीही मोठी अडचण येऊ नये यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. . आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमचे उत्पन्न चांगले वाढेल. त्यामुळे आठवड्याची चांगली सुरुवात होईल. तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी काहीतरी नवीन करायला आवडेल. संपत्तीच्या बाबतीत सुरुवातीला अडचणी येणार आहेत. मात्र, तुम्हाला रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल. एखाद्या गोष्टीसाठी तुमच्यावर आरोप होण्यापूर्वी सावध राहा. आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्च कमी होतील. त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. नोकरदार लोकांना कामाचा आनंद मिळेल आणि वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल. जेवणातही नियमितता ठेवावी लागते. आठवड्याचे पहिले आणि शेवटचे दोन दिवस प्रवासासाठी चांगले असणार आहेत.
वृषभ- राशीचा हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. विवाहित लोकांचे घरगुती जीवनात चांगले अनुभव येणार आहेत. दुसरीकडे, भावनिक असणाऱ्यांनी खूप सावधगिरी बाळगावी. अन्यथा प्रेम जीवनात त्यांचे भांडण होऊ शकते. खर्च वाढल्याने चिंता वाढेल. तुमच्या उत्पन्नात घट होऊ शकते, त्यामुळे कोणतेही नवीन कर्ज घेऊ नका. नोकरदार लोकांच्या कामाचे कौतुकही होईल. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यांची एकाग्रता कमी होणार असल्याने एकाग्रता वाढवण्यावर भर द्यावा लागेल. सप्ताहाची सुरुवात प्रवासासाठी चांगली असणार आहे.
मिथुन- हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. संतान होण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. घरातील लहान भावंडांचेही चांगले सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. रागाच्या भरात कोणाशीही बोलू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा असेल. तुम्ही तुमच्या कामात झपाट्याने प्रगती करणार आहात. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. त्यांना चांगले परिणाम दिसून येणार आहेत. सप्ताहाच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंतचा काळ प्रवासासाठी अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीत काही लोकांशी खूप सावधगिरी बाळगावी लागेल.
कर्क - प्रेम जीवनात तुमच्या मनात थोडा राग येऊ शकतो. यामुळे तुमचे जोडीदाराबरोबर विनाकारण भांडण होऊ शकते. नोकरदार लोकांना त्यांच्या कामात समस्या आणि आव्हाने बघायला मिळणार आहेत. आरोग्याच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्ही तणावाखाली असणार आहात. आरोग्याची काळजी घ्या, थोडे ध्यान करा. बाहेर मोकळ्या हवेत फिरून या. आठवड्याचे पहिले दोन दिवस सोडले तर उर्वरित वेळ प्रवासासाठी अनुकूल राहील
सिंह -हा आठवडा तुमच्यासाठी नवीन सुरुवात करणारा ठरेल.जोडीदाराशीही मतभेद होऊ शकतात. मात्र, लव्ह लाईफसाठी काळ खूप अनुकूल असणार आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यावसायिक भागीदाराबरोबर कडाक्याचे भांडण होऊ शकते. त्यामुळे खूप सावधगिरी बाळगा. उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून आठवडा चांगला आहे. परंतु खर्च खूप वाढू शकतात, हे लक्षात ठेवून खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरदार लोक त्यांच्या कामाबद्दल खूप सकारात्मक राहणार आहेत. पण कोणीतरी तुमच्या विरोधात तक्रार केल्याने तुमची बदली होऊ शकते. तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवून राहा.
कन्या - विवाहित लोकांना त्यांच्या घरगुती जीवनात अजूनही काही तणाव जाणवणार आहे. सासरच्या मंडळींबरोबील नातेसंबंधात चढ-उतार जाणवतील. लव्ह लाईफसाठी थोडा कठीण काळ आहे. अनावश्यक भांडणामुळे दोघेही एकमेकांवर नाराज होऊ शकतात. त्यामुळे शांततेने आणि हळू आवाजात बोला. तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्हाला लोकांशी मैत्री करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या वरिष्ठांशी विनाकारण भांडण टाळा, कारण या काळात अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आठवड्याचे शेवटचे 2 दिवस प्रवासासाठी चांगले असतील.
तुळ- हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र ठरणार असताना नाते अधिक घट्ट करण्याठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अडचणीच्या काळात तुमचे अनेक मित्र तुम्हाला सपोर्ट करताना दिसतील. येथून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहात. सध्या तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अचानक तुम्हाला काही मोठा नफा मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठे पद मिळू शकते, त्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. या दरम्यान, अतिआत्मविश्वासाने कोणावरही आपले आदेश लादणे टाळा. प्रवासासाठी आठवडा फारसा अनुकूल नसल्याने प्रवास टाळा.
वृश्चिक - हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहणार आहे. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदी दिसणार आहे. तुमच्या सासरच्या मंडळींकडूनही तुम्हाला चांगली बातमी कळू शकते. तुम्ही तिथे कार्यक्रमात जाऊ शकता. तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी शॉपिंग देखील करणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. याकडेही लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे. कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या आठवडा थोडा कमजोर असतनाही खर्च खूप जास्त होईल. आठवड्याचा सुरुवातीचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे
धनु- हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. विवाहित लोकांच्या घरगुती जीवनात आनंदी वातावरण असताना नाते अधिक घट्ट होईल. नोकरदार लोकही ऑफिसमधील सहकाऱ्यांना साथ देणार आहे. त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे नोकरीत परिस्थिती चांगली राहील. आरोग्याची चांगली स्थिती राहील. सप्ताहाची सुरुवात आणि मध्य प्रवासासाठी उत्तम राहील.
मकर - हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. विवाहित लोकांचे घरगुती जीवन तणावाचे असणार आहे. एकमेकांशी वाद न अहंकाराची भावना यामुळे एकमेकांना बदनाम करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. दृष्टिकोनातून आता तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जेवणातही नियमितता ठेवा. व्यवसायात चढ-उतार दिसून येतील. व्यावसायिक भागीदारांशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगा. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळेल. नोकरीत परिस्थिती अजूनही त्रासदायक आहे. कठोर परिश्रम करत राहा आणि मग सर्व काही ठीक होईल. आठवड्याचा सुरुवातीचा दिवस वगळता उर्वरित वेळ प्रवासासाठी अनुकूल आहे.
कुंभ - हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप रोमँटिक आणि सुंदर असेल. तुम्ही त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. आता तुमचे काही विरोधक समोर येतील, पण ते तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. मात्र, तुम्ही नुकसान होणारच नाही, या विचारात गाफील राहू नका. प्रवासासाठी आठवडा चांगला आहे.
मीन - हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. घरगुती जीवन जगणाऱ्या लोकांनी त्यांच्या नात्यात परस्पर समंजसपणा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समस्या समजून सोडवण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला उत्पन्न वाढवण्यावर आणि खर्चावर अंकुश ठेवण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. छोटीशी अडचण आली तरी काळजी घ्या. तुम्हाला प्रवासासाठी हा आठवडा अनुकूल आहे.
हेही वाचा-
Panchang: सूर्योदय आणि सूर्योस्ताची वेळ, शुभ मुहूर्त राहुकाल तिथी; जाणून घ्या पंचांग
Love Horoscope : 'या' राशीच्या कपल्ससाठी रविवारचा दिवस असेल रोमॅटिंक; वाचा, लव्हराशी
Today Horoscope: 'या' राशीतील लोकांना नोकरीत बढती मिळणार, वाचा रविवारचे राशीभविष्य