पाटणा - योगगुरू बाबा रामदेव यांच्यानंतर बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान केले. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष्य केले. जितकी हिंदी सोनिया गांधींना येते. तेवढेच डॉक्टरांना कोरोनाबद्दल कोरोना रोगाबद्दल माहित आहे, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.
संजय जयस्वाल यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भगवे कपडे परिधान करणाऱ्यावर भाष्य केले. कोरोना संकटात खबरदारी घेणे आवश्यक आहे. राहुल गांधी जेवढे मंदिरात जातात. तेवढ्याच प्रमाणात लोकांनी घराबाहेर पडावे. ज्याप्रमाणात आदित्यानाथ भगवे कपडे परिधान करतात, त्याप्रमाणे लोकांनी मास्क घालावे, असे जयस्वाल म्हणाले. तसेच सोनिया गांधींना जेवढी हिंदी येते. तेवढेच डॉक्टारांना कोरोना रोगाबद्दल माहिती आहे, अशी टीका त्यांनी केली.
जीतनराम मांझी-तेज प्रताप यादव भेटीवर प्रतिक्रिया -
आमदार तेज प्रताप यादव शुक्रवारी माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांची भेट बंद खोलीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या भेटीचे कारण काय आहे, यावर सध्या चर्चा सुरू आहे.संजय जयस्वाल यांनी तेज प्रताप आणि जीतनराम मांझी यांची भेट प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. दोन्ही नेत्यांच्या बैठकीसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की तेज प्रताप यादव यांना जीतनराम मांझीसोबत भाजपात यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. जर ते मांझीमार्गे एनडीएमध्ये आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू.
तेजस्वी यादव यांच्यावर टीका -
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यावर संजय जयस्वाल यांनी टीका केली. आजकाल बिहारमध्ये आश्चर्यकारक घटना घडत आहेत. जेव्हा बिहारमधील लोकांवर संकट येते. तेव्हा विरोधी पक्षनेते अदृश्य होतात. संकट संपल्यावर पाटणात परत येतात. त्यामुळे कदाचित त्यांचे आमदार असमाधानी असून मांझी यांच्या पक्षात सहभागी होऊ इच्छित आहेत, असे जयस्वाल म्हणाले.