ETV Bharat / bharat

ChatGPT Blocked : 'या' मोठ्या कंपनीने आपल्या उपकरणांवर चॅटजीपीटी वापरण्यास घातली बंदी - ChatGPT ban

सॅमसंगने कंपनीच्या कॉम्प्युटर, टॅबलेट आणि फोनवर चॅटजीपीटी आणि मायक्रोसॉफ्टच्या बिंग आणि गुगलच्या बार्डसारख्या इतर एआय सेवांवर बंदी घातली आहे. हा नियम फक्त सॅमसंगने त्याच्या कर्मचाऱ्यांना जारी केलेल्या उपकरणांना लागू होतो.

Chat GPT
Chat GPT
author img

By

Published : May 3, 2023, 3:37 PM IST

नवी दिल्ली : सॅमसंग (Samsung) कंपनीने आपल्या मालकीच्या उपकरणांवर तसेच कंपनीच्या मालकीच्या नसलेल्या उपकरणांवरही अंतर्गत नेटवर्कवर चालणाऱ्या Chat GPT सारख्या जनरेटिव्ह एआय टूल्स वापराची चांगली कोंडी केली आहे. आमच्या सहकारी इंग्रजी संकेतस्थळाने प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मागील महिन्यात सॅमसंगचा काही प्रमाणात डेटा चुकून चॅटजीपीटीवर लीक झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधीच्या माहितीनुसार, सॅमसंगच्या सेमीकंडक्टर डिव्हिजनने अभियंत्यांना चॅटजीपीटी वापरण्याची परवानगी देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत कामगारांनी कमीतकमी गुप्त माहिती जाहीर (लिक) करण्याच्या घटना तीन वेळा घडल्या आहेत.

सॅमसंगने या बातमीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही : कंपनीने Chat GPT आणि इतर AI सेवा जसे की Microsoft च्या Bing आणि Google's Bard वरील संगणक, टॅबलेट आणि फोनवर बंदी घातली आहे. हा नियम फक्त सॅमसंगने त्यांच्या कामगारांना जारी केलेल्या उपकरणांना लागू होईल, अशीही माहिती समोर आली आहे. सॅमसंग फोन, लॅपटॉप आणि इतर कनेक्टेड डिव्हाइसेसचे मालक असलेले ग्राहक आणि इतर या नियमाने प्रभावित होणार नाहीत. दरम्यान, सॅमसंगने या बातमीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

कोणतीही कंपनी-संबंधित माहिती किंवा वैयक्तिक डेटा सबमिट करू नये : डेटा लीक झाल्यानंतर, सॅमसंगने इतरत्र जनरेटिव्ह एआय टूल्सचा वापर करणार्‍या कर्मचार्‍यांना "कोणतीही कंपनी-संबंधित माहिती किंवा वैयक्तिक डेटा सबमिट करू नये" असे सांगितले, जे मेमोनुसार त्यांची बौद्धिक संपत्ती उघड करू शकते. Chat GPT च्या डेटा धोरणात असे म्हटले आहे की, जोपर्यंत वापरकर्ते स्पष्टपणे निवड रद्द करत नाहीत तोपर्यंत ते त्यांच्या मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या प्रॉम्प्टचा वापर करत नाहीत. असेही बोलले जात आहे की, सॅमसंग "सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि ट्रान्सलेशन" साठी स्वतःचे इन-हाउस एआय टूल्स विकसित करत आहे.

हेही वाचा : ईपीएफओने उच्च पेन्शन मिळण्याच्या अर्जाला दिली मुदतवाढ, जाणून घ्या, संपूर्ण प्रक्रिया आता 26 जूनपर्यंत करता येणार अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.