मधुबनी (बिहार) - असे म्हणतात की 'उपर वाला देता है तो छप्पर फाड कर देता है', या म्हणीची प्रचिती येणारी घटना ही बिहार मधील मधुबनी येथे घडली आहे. येथील एक न्हावी व्यावसायिक हा रात्रीच करोडपती झाला आहे. सलून चालक अशोक ठाकूर याने आईपीएलशी निगडीत असलेल्या एका ऑनलाईन अॅपवर काही पैसेंची गुंतवणूक करून एक कोटी रुपये जिकंले आहेत.
तरूणाचा आहे सलुन व्यवसाय -
अंधराठाढी परिसरातील ननौर चौकात अशोक कुमार ठाकूर हा सलुन चालवतो. तो झंझारपूर भागातील अररिया संग्राम येथील रहिवासी आहे. सलून चालून त्याचा उदरनिर्वाह चालतो. अशोक याने सांगितले की, त्याने अश्याप्रकारे यापूर्वीही अनेकदा ऑनलाईन पैश्यांची गुंतवणूक केली होती मात्र त्यावेळी त्याला काहीच मिळाले नाही.
मिळणार 70 लाख रुपये -
परंतु, रविवारी रात्री चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकत्ता नाईटराइडर्स यांचा सामना होता. या सामन्याने त्याचे नशिब बदलले. ऑनलाईन 49 रुपये भरून स्वतःची एक टीम त्याने बनवली आणि त्याद्वारे एक करोड रुपये त्याने जिंकले. मात्र, यातील तीस टक्के हे कर स्वरूपात कमी करण्यात येणार आहेत. तरी त्याला 70 लाख रुपये हे मिळणार आहेत. त्याने बक्षिस जिंकल्याचा संदेशही आईपीएलकडून आला आहे. तसेच याबाबतचा फोनही त्याला अधिकाऱ्यांकडून आला आहे.
दोन दिवसात मिळणार पैसे -
अशोक याने सांगितले आहे की, ही रक्कम मला मी तयार केलेल्या टीमच्या खेळाडूंनी केलेल्या सर्वोत्कृष्ट खेळामुळे मिळाले आहे. यापूर्वीही अनेकदा ऑनलाईन पैश्यांची गुंतवणूक केली होती मात्र त्यावेळी त्याला काहीच मिळाले नाही. एक ते दोन दिवसांमध्ये बक्षिसाचे पैसे पाठवून देण्यात येतील असे सांगितले आहे.
रात्रभर झोप आलीच नाही -
बक्षिस जिंकल्याची माहिती मिळाल्यानंतर मला रात्रभर झोप आली नाही. आनंदाने मी सर्व लोकांना याची माहिती देत होतो. अशोक यांनी सांगितले की, इतके रुपये आल्यानंतरही तो आपले काम सोडणार नाही, आपल्यावरील कर्ज देऊन स्वतःसाठी घर बनवणार आहे.
हेही वाचा - मुलांना कोरोना होण्याची भीती वाटतंय? रिसर्च म्हणते...