रेवा ( मध्यप्रदेश ) : सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका कथावाचन करणाऱ्या बाबाने एका अल्पवयीन मुलीला शासकीय इमारतीच्या सर्किट हाऊसमध्ये बोलावून आपल्या वासनेचे बळी बनवले. बाबाने तिला परीक्षेत पास होण्याच्या बहाण्याने तिथे बोलावले होते. या घटनेत चार आरोपींचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर आरोपींनी पीडितेला आधी दारू पाजली. त्यानंतर बळजबरीने संत सीताराम याच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे ( Narrator Saint Raped Teenager In Rewa ).
परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे दाखवले आमिष : सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी की, विनोद पांडे नावाच्या एका बदमाशाने परीक्षेत उत्तीर्ण करण्याच्या बहाण्याने या अल्पवयीन मुलीला सैनिक शाळेत बोलावले. त्यानुसार ती तिथे पोहोचली. यानंतर आरोपी विनोद पांडे याने त्याच्या साथीदाराला पाठवून मुलीला राज निवासमध्ये बोलावले. सर्किट हाऊसमध्ये विनोद पांडे, बाबा सीताराम आणि अन्य दोघे उपस्थित होते. आरोपींनी आधी स्वतः दारू घेतली. नंतर मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. यानंतर तिघे आरोपी खोलीबाहेर गेले आणि बाबा सीताराम याने मुलीवर बलात्कार केला.
संत आणि अन्य दोन आरोपी फरार : पीडितेने सीताराम याच्या तावडीतून कशीतरी सुटका करून पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. बराच दबाव आल्याने पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली. मात्र, घटनेतील मुख्य आरोपी बाबा सीतारामसह अन्य दोन आरोपी फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बाबा सीताराम यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी विनोद पांडे याचाही गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.
१ एप्रिलला होणार होते प्रवचन : रेवा येथे १ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत समदिया गोल्ड मॉलमध्ये संकटमोचन हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वेदांती महाराजांचा नातू बाबा सीताराम हा प्रवचन देणार होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेबाबत सीताराम याने रेवा येथील अनेक बड्या व्यक्तींचीही भेट घेतली होती. ज्यामध्ये मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम, आयुक्त अनिल सुचारी आणि एसपी नवनीत भसीन यांचाही समावेश आहे. बलात्काराच्या घटनेनंतर सीतारामसोबत बड्या सेलिब्रिटींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सीआयडी तपास करून आरोपींना फाशी देण्याची काँग्रेसची मागणी : याप्रकरणी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा कविता पांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या घटनेला अत्यंत लज्जास्पद म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, सीएम शिवराज रीवा येथे येणार आहेत, अशा परिस्थितीत त्यांनी अल्पवयीन पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, असेही म्हटले आहे.