ETV Bharat / bharat

Sabarimala Revenue Record : शबरीमाला मंदिरातील महसूलात यावर्षी नोंद होणार उच्चांक, 7 कोटी नाण्यांची मोजणी बाकी - शबरीमाला मंदिरातील मकरविलक्कू हंगाम

शबरीमाला मंदिरातील मकरविलक्कू हंगाम लवकरच संपणार आहे. त्यामुळे या हंगामात शबरीमाला देवस्थानाला भाविकांनी भरभरुन दान दिले आहे. अद्यापही 7 कोटींच्या नाण्यांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे यावर्षी शबरीमाला मंदिराला 330 कोटींचे दान मिळण्याची अपेक्षा आहे.

Sabarimala Revenue Record
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 19, 2023, 9:29 PM IST

पठाणमथिट्टा - केरळमधील शबरीमाला मंदिरातील मकरविलक्कू हंगाम 20 जानेवारीला संपणार आहे. यावर्षी मंदिराच्या महसूलात प्रचंड वाढ झाली असून मंदिर महसूलाच्या बाबतीत नवा विक्रम नोंदवण्यात येणार असल्याचे वर्तवण्यात येत आहे. मंदिरात अद्यापही देणग्यांची मोजणी सुरू आहे. हुंड्यांमधून जमा झालेल्या नाण्यांची मोजणी पूर्ण होण्यास काही दिवस लागू शकतात. तर 7 कोटी किमतीची नाणी अद्यापही मोजायची बाकी आहेत. त्यासाठी आणखी साठ लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलक्कल आणि पंबा येथील आणखी दोन हुंडया उघडल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंदिराला 330 कोटींचा मिळणार महसूल : शबरीमाला मंदिराला आत्तापर्यंत 318 कोटींचा महसूल मिळाला आहे. या हंगामात नवा उच्चांक नोंदवला जाणार आहे. तर वर्षभरात हा आकडा 330 कोटींवर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भाविकांनी शबरीमला देवस्थानाला भरभरुन दान केले आहे. त्यामुळे या देवस्थानाकडे यावर्षी देणगींचा नवा उच्चांक स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोजणीला उशीर झाल्यामुळे नोटांचे नुकसान : शबरीमाला देवस्थानातील देणगीच्या मनोजणीला यावेळी उशीर झाला आहे. त्यामुळे देणगीतील अनेक नोटा खराब झाल्या आहेत. भाविकांनी दिलेले दान असे खराब झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाविकांनी शबरीमाला देवस्थानाला भरुभरुन दान दिले आहे. मात्र देवस्थानाच्या कारभारामुळे त्या दानातील लाखो रुपयांच्या नोटा खराब झाल्या आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

केरळ उच्च न्यायालयाने मागितला अहवाल : देवस्थानाला मिळालेल्या भाविकांच्या दानातील लाखो रुपयांचे दान खराब झाले आहे. त्यामुळे देवस्थानालाही मोठा फटका बसला आहे. दानातील चलनी नोटा खराब झाल्याने भाविकांमधूनही संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे केरळ उच्च न्यायालयाने त्रावणकोर देवस्थान बोर्डाकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे. देवस्थानाच्या मोजणीत काही बिघाड झाला आहे का याबाबतचा अहवाल दक्षता शाखेने लवकर साधर करण्याचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा - Controversy of Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींच्या दाव्यांची महाराष्ट्राने केली पोलखोल, एकच सवाल चमत्कार कधी दिसणार

हेही वाचा - Dhirendra Shastri Accepted Challenge : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकारले श्याम मानवांचे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.