नवी दिल्ली सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजाला जागृत आणि एकत्रित करण्याचे काम करत आहे RSS. जेणेकरून भारत संपूर्ण जगासाठी एक आदर्श समाज म्हणून उदयास येईल. भागवत म्हणाले की, लोकांनी वैयक्तिक नव्हे तर समाजिक भावनेने समाजाची सेवा करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली युनिटने आयोजित केलेल्या कार्यक्रत मोहन भागवत यांनी संघाच्या स्वयंसेवकांद्वारे केल्या जात असलेल्या विविध कल्याणकारी कामांचा उल्लेख केला. सरसंघचालक म्हणाले की, संघ समाजाला जागृत आणि एकत्रित करण्याचे काम करत आहे. संपूर्ण जगासाठी भारत एक आदर्श समाज म्हणून उदयास येऊ शकेल. यासाठी अधिक संघटितपणे काम केले पाहिजे.
भागवत म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी समाजातील विविध घटकांतील अनेक व्यक्तींनी योगदान दिले आणि बलिदान दिले. भारतीयांचा डीएनए आणि मूळ स्वभाव हा आहे की ते व्यक्ती म्हणून नव्हे तर समाज म्हणून विचार करतात. आपण त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कल्याणकारी कामांचा उल्लेख करून भागवत म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक वैयक्तिक हिताची पर्वा न करता संपूर्ण समाजासाठी काम करतात. कल्याणकारी कार्य करताना मी आणि माझे या भावनेच्या पलिकडे जाण्याची गरज आहे. यामुळे समाज म्हणून आपला विकास होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.