शिमला : रोडवर वाहन चालवतना वाहनापेक्षाही अगोदर वाहनाच्या नंबरवर लक्ष जाते. त्यामुळे अनेक जण वाहनाच्या नंबरसाठी लाखो रुपये मोजतात. हिमाचल प्रदेशात मात्र एका पठ्ठ्याने स्कुटीच्या व्हिव्हिआयपी नंबरसाठी तब्बल एक कोटी रुपये मोजल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शौकासाठी काहीजण कितीही पैसे मोजयला तयार असल्याचे या घटनेवरुन दिसून येते.
स्कुटीच्या नंबरसाठी एक कोटीचा बोली : शिमल्यातील स्कुटीच्या व्हिव्हीआयपी नंबरची बोली एक कोटीच्या पुढे गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिव्हिआयपी स्कूटीचा क्रमांक एचपी 999999 आहे. या क्रमांकासाठी 1000 रुपये राखीव किंमत ठेवण्यात आली होती. मात्र शिमल्यातील कोटखई परिसरातील या क्रमांकासाठी आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षाही अधिकची बोली लागली आहे. हा क्रमांक घेण्यासाठी तब्बल 26 जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या क्रमांकाची बोली एक कोटी अकरा हजार रुपयांवर पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्या सायंकाळपर्यंत लागणार बोली : परिवहन विभागाच्या वतीने व्हिव्हिआयपी क्रमांकासाठी बोली आमंत्रिक करते. ही बोली ऑनलाईन आयोजित करण्यात येते. परिवहन विभागाच्या नोंदणी आणि परवाना विभागाने एचपी 999999 हा क्रमांक कोटखईसाठी ठेवण्यात आला आहे. या क्रमांकासाठी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बोली लावण्यात येणार आहे. वेळ संपल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते हा क्रमांक कोणाला दिला याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल. एचपी 99 हा कोटखाईचा क्रमांक आहे, तर नंबर प्लेट 9999 आहे. ही एकत्रितपणे एचपी 999999 अशी दिसते.
आणखीही आहेत व्हिव्हिआयपी क्रमांक : एचपी 999999 या क्रमांकासाठी एक कोटीचा बोली लागल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र यासारखेच दुसरेही व्हिव्हिआयपी क्रमांक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात एचपी 990009, एचपी 990005, एचपी 990003 यासारखे क्रमांक आहेत. त्यासाठी 21 लाख, 20 लाख आणि 10 लाखाच्या बोली लावण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या क्रमांकासाठी बोली लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र त्यातही नागरिकांचे लक्ष एचपी 999999 वर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शौकासाठी काहीजण कितीही पैसे मोजायला तयार असल्याचे यावरुन दिसून आले.
एक लाखाची स्कुटी एक कोटीचा क्रमांक : बाजारात सध्या साधारण 80 हजार रुपयापासून स्कुटी उपलब्ध आहेत. मात्र हिमाचलमध्ये स्कुटीच्या क्रमांकासाठी एक कोटीची रक्कम मोजायला नागरिक तयार आहेत. त्यामुळे एक लाखाची स्कुटी आणि एक कोटीचा क्रमांक असल्याचे पाहुन नागरिक हैराण झाले आहेत.
हेही वाचा - AIIMS Sent Medicines Through Drone : ऋषीकेश एम्सने दुर्गम भागात पाठवले ड्रोनने औषधे, देशातील एम्सचा पहिलाच प्रयोग