हैदराबाद (तेलंगणा): तेलंगणातील शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (RGIA) गुरुवारी ७ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. शारजाहमार्गे हैदराबादला पोहोचलेल्या चार परदेशी प्रवाशांकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर अधिकाऱ्यांनी चार सुदानी नागरिकांना अटक केली आहे. पुढील कारवाई करताना त्याची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर (MIA) एका प्रवाशाकडून सुमारे 16 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते.
परदेशी नागरिकांना अटक: मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी शमशाबाद विमानतळावर फ्लाइट क्रमांक- G9 458 वरून येथे आलेल्या प्रवाशांपैकी 23 जणांची सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर अधिकाऱ्यांनी चौकशी केली. हे सर्व प्रवासी सुदानहून शारजामार्गे हैदराबादला आले होते. अधिकाऱ्यांनी झडतीदरम्यान त्याच्या शूज, टाय आणि कपड्यांची झडती घेतली, त्यातून 14.9063 किलो सोने जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांना चार प्रवासी संशयास्पद वाटले आणि त्यांच्याकडे कागदपत्रे मागितली, परंतु ते मूळ कागदपत्रे दाखवू शकले नाहीत, त्यानंतर त्या चार प्रवाशांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले सर्व सुदानी नागरिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
१६२५ ग्रॅम सोनेही केले होते जप्त: मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर (MIA) सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान प्रवाशांकडून 1,625 ग्रॅम सोने जप्त केले होते. त्याची किंमत 91.35 लाख रुपयांपेक्षा जास्त होती. सीमाशुल्क विभागाने येथे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, हे सोने दुबई आणि बहरीनमधून आलेल्या पाच पुरुष प्रवाशांकडून आणले गेले होते. हे लोक अनेक मार्गांनी सोन्याची तस्करी करत असल्याचे त्यांनी सांगितले. तोंडाच्या पोकळीत, ट्रॉली बॅगच्या हँडलमध्ये, गुदाशयात आणि पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये पातळ पेस्टच्या थराच्या स्वरूपात सोने लपवले जाते.
विदेशी चलनी नोटाही जप्त: दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट क्रमांक- IX 383 मधून सोन्याची तस्करी करणाऱ्या पुरुष प्रवाशाकडून अधिकाऱ्यांनी USD 5,100 आणि £2,420 किमतीच्या विदेशी चलनी नोटाही जप्त केल्या. त्याची किंमत 6,54,750 भारतीय रुपये इतकी आहे. दरम्यान, हैदराबाद येथील या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कायमच सोने तस्करीची प्रकरणे उघडकीस येत असतात. गेल्यावर्षीही सोन्यासह अमली पदार्थांची तस्करी करताना अनेकांना याच विमानतळावर अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राजीव गांधी विमानतळावर सीमाशुल्क विभागाचे नेहमीच लक्ष असते.