ETV Bharat / bharat

RCB Vs DC, IPL 2022 : दिनेश कार्तिकची फटकेबाजी! 'RCB'कडून दिल्लीचा पराभव

author img

By

Published : Apr 17, 2022, 7:19 AM IST

आरसीबीच्या विजयात दिनेश कार्तिकने मोलाचा वाटा उचलला. कार्तिकने चौकार, सिक्सर लागावत धडाकेबाज भागेदारी केली. आयपीएलच्या (27)व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ( Royal Challengers Reached 189 ) आपल्या जोरदार फटकेबाजीवर दिल्ली कॅपिटल्सचा 16 धावांनी पराभव केला.

'RCB'कडून दिल्लीचा पराभव
'RCB'कडून दिल्लीचा पराभव

मुंबई - आयपीएलच्या (27)व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ( Royal Challengers Bangalore ) आपल्या जोरदार फटकेबाजीवर दिल्ली कॅपिटल्सचा 16 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स संघाने 20 षटकांत 5 बाद 189 धावांपर्यंत मजल मारली. ( RCB Vs DC, IPL 2022 ) प्रत्युत्तरात दिल्ली निर्धारित 20 षटकांत 173 धावाच करू शकली आणि संघाला पाच सामन्यातील तिसरा पराभव पत्करावा लागला.

दिल्लीसाठी डेविड वॉर्नरने 66 धावांची खेळी केली - आरसीबीच्या विजयात दिनेश कार्तिकने मोलाचा वाटा उचलला आहे. कार्तिकने चौकार, सिक्सर लागावत धडाकेबाज भागेदारी केली आहे. (Royal Challengers Bangalore 2022) त्याने सर्वाधिक नाबाद 66 धावा करून महत्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. त्यामध्येच थोड्या-थोड्या अंतराने विकेट घेत दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. बेंगलोरकडून जोश हेझलवुडने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच, मोहम्मद सिराजने दोन आणि वानिंदू हसरंगाने एक गडी बाद केला. दुसरीकडे, दिल्लीसाठी डेविड वॉर्नरने 66 धावांची खेळी केली. तर कर्णधार ऋषभ पंतने 34 धावा केल्या.

मार्शने 24 चेंडूत 14 धावा केल्या - आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नरच्या सलामी जोडीने दिल्लीला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 50 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली असताना सिराजच्या गोलंदाजीवर शॉ स्वस्तात बाद झाला. यांनतर दिल्लीसाठी पदार्पण केलेला नवोदीत मिचेल मार्शने सलामीवीर वॉर्नरसह संघाचा डाव सावरला. (Bangalore beat Delhi Capitals by 16 runs) वॉर्नर 38 चेंडूत 66 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला, तर पहिला सामना खेळणाऱ्या मिचेल मार्शच्या अतिशय संथ खेळीचा अंत रनआऊटने झाला. मार्शने 24 चेंडूत 14 धावा केल्या.

पंत बाद होताच संघाच्या विजयच्या आशाही मावळल्या - हेझलवूडने आपल्या डावातील तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोवमन पॉवेलला खाते न उघडता आल्या पावली माघारी धाडलं. हेझलवूडने आपल्या तिसऱ्या षटकातील पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट घेत सामन्यातील बेंगलोरची स्थिती मजबूत केली. पहिल्या चेंडूवर पॉवेल, तर अखेरच्या चेंडूवर ललित यादवने आपली विकेट गमावली. यानंतर कर्णधार ऋषभ पंत बाद होताच संघाच्या विजयच्या आशाही मावळल्या.

एशिअवय अनुज रावत खातेही उघडू शकला नाही - दिल्लीने नाणेफेक जिंकून बेंगलोरला पहिले फलंदाजीला बोलावले. रॉयल चॅलेंजर्सची सुरूवात खराब झाली, तरी मॅक्सवेल आणि कार्तिकची अर्धशतकी खेळी लक्षवेधी ठरली. आरसीबीतर्फे दिनेश कार्तिकने नाबाद 66 आणि ग्लेन मॅक्सवेलने 55 धावा केल्या. कार्तिक आणि शाहबाझ अहमद यांनी सहाव्या विकेटसाठी 52 चेंडूत 97 धावांची भागीदारी केली. बेंगलोरचे आघाडीचे तीनही फलंदाज बॅटने फारसे योगदान देण्यात अपयशी ठरले. फाफ डु प्लेसिस 8 तर विराट कोहली 12 धावांत रनआऊट झाला. एशिअवय अनुज रावत खातेही उघडू शकला नाही.

हेही वाचा - रामोजी रावांच्या नातीचे फिल्मसिटीत लग्न; उपराष्ट्रपती, सरन्यायाधीशांसह अनेक सुपरस्टार्सची उपस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.