ETV Bharat / bharat

कोयत्याचा धाक दाखवत फुकटात जेवणाऱ्या  गुंडाच्या लेडी सिंघमने आवळल्या मुसक्या - Rowdy Sheeter attacks on Shop over Bill

अंडा गाडीवर फुकटात जेवणाऱ्या गुंडाच्या शहरातील लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या सीपीआय भाग्यवंती यांनी मुसक्या आवळल्या. कर्नाटकाच्या राणेबेनूरमध्ये ही घटना घडली आहे. सीपीआय भाग्यवंती यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोयत्याचा धाक दाखवत फुकटात जेणाऱ्या गुंडांच्या लेडी सिंघमने आवळल्या मुसक्या

author img

By

Published : Apr 9, 2021, 8:15 PM IST

Updated : Apr 9, 2021, 10:53 PM IST

हावेरी - तीन महिने फुकट जेवल्यानंतर अंडा राईसच्या गाडीच्या मालकाने संबंधिताकडे बिल मागितले. मात्र, पैसे न देता गाडी चालकावरती कोयत्याने हल्ला केल्याची घटना कर्नाटकातील राणेबेनूरमध्ये घडली. हे कृत्य त्या गुंडाला चांगलेच महागात पडले आहे. शहरातील लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या सीपीआय भाग्यवंती यांनी गुंडाला चांगलाच हिसका दाखवला. थेट अंडा गाडीवरून चार चौघांसमोर गुंडाची गचेंडी धरून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोयत्याचा धाक दाखवत फुकटात जेवणाऱ्या गुंडाच्या लेडी सिंघमने आवळल्या मुसक्या

कर्नाटकाच्या राणेबेनूरमध्ये सिद्धलिंग्प्पा यांचा अंडा राईसचा गाडा आहे. त्यांच्या गाड्यावर गेल्या तीन महिन्यापासून फक्किरेशा अंगादी नावाच एक गुंड फुकटात खात होता. अखेर हिम्मत करून सिद्धलिंग्प्पा यांनी त्याला बील भरण्यास सांगितले. मात्र, बील न भरता त्याने उलट सिद्धलिंग्प्पा यांच्यावर हल्ला केला. यासंदर्भात माहिती मिळताच सीपीआय भाग्यवंती यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीपीआय भाग्यवंती यांनी गुंडाची गचेंडी धरून त्याच्या मुसक्या आवळल्या आणि तुरुंगात डांबले. गुंडापासून सुटका झाल्याने अंडा गाडीमालक सिद्धलिंग्प्पा यांनी आनंद व्यक्त केला. सीपीआय भाग्यवंती यांची शहरात लेडी सिंघम अशी ओळख आहे. यापूर्वीही त्यांना अनेक गुंडाना गजाआड केले आहे.

हेही वाचा - VIDEO : एकदा बघाच! वर्दीत पोलिसांचा नागीन डान्स, तुफान व्हायरल..

Last Updated : Apr 9, 2021, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.