ETV Bharat / bharat

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह यांना न्यायालयाचा समन्स, 18 जुलैला हजर राहण्याचे आदेश - wrestlers protest

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्राची दखल घेत राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने त्यांना समन्स जारी केला आहे. न्यायालयाने ब्रिजभूषण यांना 18 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Brij Bhushan Singh
ब्रिजभूषण सिंह
author img

By

Published : Jul 7, 2023, 5:55 PM IST

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपी असलेले भारतीय कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी आता वाढू शकतात. कुस्तीपटूंच्या आरोपांप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्राची दखल घेत राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांना समन्स बजावले आहे. दोघांना 18 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र : यापूर्वी सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेण्यासाठी 7 जुलै ही तारीख निश्चित केली होती. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात 15 जून रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 22 जून रोजी राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टात यावर सुनावणी करताना मुख्य महानगर दंडाधिकारी (सीएमएम) महिमा राय सिंह यांनी हे प्रकरण एमपी - एमएलए न्यायालयात वर्ग केले. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण एसीएमएम हरजीत सिंग जसपाल यांच्याकडे पाठवले.

पोक्सो कलम हटवण्यासाठी कोर्टात अहवाल दाखल : पोक्सो (POCSO) प्रकरणातील तपास पूर्ण झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 15 जून रोजीच पटियाला हाऊस कोर्टात कॅंसलेशन अहवाल दाखल केला आहे. कोर्टाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर दाखल करण्यात आलेला 550 पानांचा कॅंसलेशन अहवाल पोलिसांनी तक्रारदार पीडितेचे वडील आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे तयार केला आहे. महिला कुस्तीपटू अल्पवयीन नसल्याबाबत सविस्तर माहिती देताना पोलिसांनी अहवालातील पोक्सो कलम रद्द करण्याची विनंती केली आहे. कलम 173 सीईपीसी अंतर्गत कॅंसलेशन अहवाल दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे.

काय आहे प्रकरण? : जानेवारीमध्ये महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने एक अंतर्गत समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी समितीकडे सोपवली. मार्चमध्ये अंतर्गत समितीचा अहवाल समोर आल्यानंतर महिला कुस्तीपटूंनी समितीवर पक्षपाताचा आरोप केला होता. 28 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण विरुद्ध आयपीसीसह पॉक्सो अंतर्गत एफआयआर नोंदवला.

हे ही वाचा :

  1. Wrestlers Protest : आंदोलक कुस्तीपटू आणि योगेश्वर दत्त पुन्हा आमनेसामने, फेसबुक लाईव्ह करत एकमेकांवर गंभीर आरोप
  2. Wrestlers Sexual Abuse Case : ब्रिजभूषण सिंह कुस्तीपटू महिला लैंगिक शोषण प्रकरणात आरोपपत्र दाखल, न्यायालय आज दखल घेण्याची शक्यता
  3. Wrestlers Protest : आशियाई चॅम्पियनशिपची तयारी, आंदोलक कुस्तीपटू सरावासाठी परतले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.