ETV Bharat / bharat

रोहतक हत्याकांड : एकुलत्या एक मुलानेच केला आई-वडिलांसह बहिणीचा खून; पोलिसांचा खुलासा - एकुलत्या एक मुलानेच केला आई-वडिलांसह बहिणीचा खून

परिवारात काही ताणतणावाचे वातावरण होते. याची अनेक कारणे समोर येत आहेत. आरोपी दिलेला जबाब पुन्हा पुन्हा बदलत होता. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यानंतर आरोपीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली.

rohtak-murder-case-big-disclosure-abhishek-killed-his-family
एकुलत्या एक मुलानेच केला आई-वडिलांसह बहिणीचा खून
author img

By

Published : Sep 1, 2021, 4:39 PM IST

Updated : Sep 1, 2021, 5:34 PM IST

रोहतक (हरयाणा) - विजयनगर कॉलनीतील पहलवान परिवारातील चार सदस्यांच्या हत्येचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी याबाबत खुलासा करत दावा केला आहे आहे, 20 वर्षाच्या एकुलत्या एक मुलानेच संपूर्ण परिवाराची हत्या केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली. संपत्तीच्या वादातून त्याने हे कृत्य केले. या घटनेत आई, वडील, आईची आई आणि बहिणीचा मृत्यू झाला आहे.

पोलीस अधिकारी राहुल शर्मा याबाबत माहिती देताना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवारात काही ताणतणावाचे वातावरण होते. याची अनेक कारणे समोर येत आहेत. आरोपी दिलेला जबाब पुन्हा पुन्हा बदलत होता. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यानंतर आरोपीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली. आरोपी अभिषेकने आपल्या परिवाराची हत्या केल्यानंतर तो एका मित्रासोबत हॉटेलमध्ये गेला होता. यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. पोलीस ते लवकरच जाहीर करणार आहे.

याप्रकरणी पोलीस आज आरोपी अभिषेकला न्यायालयात हजर करत त्याच्या रिमांडची मागणी करतील. या प्रकरणात अभिषेकने ज्या शस्त्राचा वापर केला त्याला ताब्यात घेण्यात येईल. तसेच या हत्या प्रकरणाचे घटना रुपांतरण करण्यात येईल. तसेच कोणत्या कारणातून अभिषेकने हे पाऊल उचलले, याची संपूर्ण चौकशी केली जाईल. दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात फक्त अभिषेकला अटक करण्यात आली आहे. तर उरलेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

काय आहे घटना?

27 ऑगस्टला दुपारच्या सुमारास विजयनगर कॉलनीत राहणारे व्यावसायिक आणि पहलवान प्रदीप उर्फ बबलू, त्यांची पत्नी बबली, रोशनी आणि मुलगी तमन्नावर घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. यात बबलू, बबली आणि रोशनीचा जागीच मृत्यू झाला होता. तर तमन्नाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्याकांडमधील प्रमुख आरोपी अभिषेक उर्फ मोनू पहलवान आहे. तो BAच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.

Last Updated : Sep 1, 2021, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.