मुंबई सीबीआयने रविवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया Deputy Chief Minister Manish Sisodia आणि दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यात नाव असलेल्या १२ जणांविरुद्ध लुक आउट परिपत्रक जारी Manish Sisodia look out notice केल्यानंतर त्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनिष सिसोदिया यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार म्हणाले, की दिल्ली सरकारने तयार केलेल्या नवीन दारू धोरणात अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शुक्रवारी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. सर्वसामान्य जनता दबक्या आवाजात न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतेय, ही आजची वस्तूस्थिती असताना सरन्यायाधीशांचं वक्तव्य खूप बोलकं आणि आश्वासक वाटतं. खोटे आरोप करून आणि #CBI चे छापे टाकून एखाद्या चांगल्या नेत्याची प्रतिमा मलिन करून विरोधी पक्षाला निवडणुकीत घेरता येत नाही. ये जो पब्लिक है ये सब जानती है।
-
खोटे आरोप करून आणि #CBI चे छापे टाकून एखाद्या चांगल्या नेत्याची प्रतिमा मलिन करून विरोधी पक्षाला निवडणुकीत घेरता येत नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ये जो पब्लिक है ये सब जानती है।
I Support @msisodia. pic.twitter.com/rfYJpyqhNO
">खोटे आरोप करून आणि #CBI चे छापे टाकून एखाद्या चांगल्या नेत्याची प्रतिमा मलिन करून विरोधी पक्षाला निवडणुकीत घेरता येत नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 21, 2022
ये जो पब्लिक है ये सब जानती है।
I Support @msisodia. pic.twitter.com/rfYJpyqhNOखोटे आरोप करून आणि #CBI चे छापे टाकून एखाद्या चांगल्या नेत्याची प्रतिमा मलिन करून विरोधी पक्षाला निवडणुकीत घेरता येत नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 21, 2022
ये जो पब्लिक है ये सब जानती है।
I Support @msisodia. pic.twitter.com/rfYJpyqhNO
सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही ही अपेक्षा संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या खटल्याची सुनावणी Rohit Pawar on Shivsena Plea in SC उद्या होणार आहे. किमान उद्या तरी सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. वेळेत न्याय झाला तरच त्याला अर्थ आहे अन्यथा त्याची किंमत शून्य आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील शालेय शिक्षणातील सुधारणांबद्दल नुकतेच सर्वत्र कौतुक झालेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उत्पादन शुल्क विभागही सांभाळतात. या घडामोडीनंतर लगेचच सिसोदिया यांनी ट्विटरवर मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली होती. ज्यामध्ये ते म्हणाले होते की, निरपराध लोकांना लक्ष्य करण्यासाठी सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. व्हिडिओसोबत दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी हिंदीमध्ये एक कॅप्शन देखील लिहिले आहे ज्याचा अनुवाद असा आहे, ऋतू हळूहळू बदलत राहतात. तथापि, तुमच्या वेगाने वाऱ्यांनाही आश्चर्यचकित केले आहे.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने शनिवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह इतरांना चौकशीसाठी समन्स बजावले. दरम्यान, त्याआधी शुक्रवारी पहाटेच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापा मारून तपासणी केली होती. जवळपास 12 तास सीबीआयचे पथक मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी तळ ठोकून होते.
हेही वाचा FIR On Sisodiya मनीष सिसोदिया यांच्यावर एफआयआर दाखल, दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या