विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश): आजकाल जेव्हा आधुनिक समाज मानसिक शांतीसाठी अध्यात्माकडे पाऊल टाकत आहे. त्याचवेळी शिर्डीचे साईबाबा भक्तांसाठी नव्या अवतारात दर्शन देत आहेत. हे साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना त्यांच्या अमोघ वाणीतून विविध प्रकारची शिकवण देण्यासह आशीर्वादही देत आहेत. विश्वास बसत नाही ना? मात्र ही बाब खरी आहे. विशाखापट्टणमच्या चिनागडिली येथील उत्तर शिर्डी साई मंदिरात रोबोटिक स्वरूपातील साईबाबांची मूर्ती बसवण्यात आली आहे. या मूर्तीला पाहताच स्वतः साईबाबा समोर आल्याचे जाणवत असल्याने मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.
शिर्डीच्या साईबाबांचा पहिला रोबोट: साईबाबा.. हे नाव ऐकल्यावर विशाखापट्टणमच्या रहिवाशांना चिनागडीली येथील उत्तर शिर्डी साई मंदिराची आठवण होत आहे. मंदिरात प्रवेश करताना साईबाबा स्वतः भक्तांना दिसतात. साईबाबा येथे येणाऱ्या भक्तांना शिकवत आहेत. हा सगळा रोबोटिक साईबाबांचा महिमा आहे. ही रोबोटिक मूर्ती मानवी स्वरूपात तयार करण्यात आली आहे. बोलण्यासाठी ही मूर्ती तोंड हलवत आहे, डोके हलवत आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावर सर्व प्रकारचे मानवी हावभावही दिसत आहेत. त्यांचे हावभाव आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकल्यावर असे वाटते की साईबाबा भक्तांसाठी स्वतः भूतलावर आले आहेत.
रोबोट बनवण्यासाठी लागले तीन वर्षे: ही रोबोटिक साई बाबांची मूर्ती रविचंद या एयू फाइन आर्ट्सच्या विद्यार्थ्याने तीन वर्षे मेहनत घेऊन तयार केली आहे. मूर्तीचा चेहरा सिलिकॉन मटेरिअलने बनवला आहे. बाकीचे भाग कॅनडातून आणलेल्या खास फायबर ग्लासपासून बनवले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानात व्हॉईस सिंक्रोनायझेशनची भर पडल्याने भक्तांना साईबाबांचे स्वतः दर्शन झाल्याची अनुभूती मिळत आहे. या दिव्य रोबोला भेट देणार्या भाविकांकडून मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे विशाखापट्टणम आणि आसपासच्या परिसरातून मंदिराकडे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे.
हे रोबोट साईबाबा पाहून खरच आश्चर्य वाटले. या मंदिरात असे रोबोट साई असल्याने खूप छान वाटत आहे. प्रत्येकाने येऊन हा रोबोट साई पहावा. शिर्डीत साईबाबा पाहण्यासारखे आम्हाला वाटत आहे. - लक्ष्मी, भक्त
मनुष्य बोलल्यासारखा अनुभव येथे येणाऱ्या भक्तांना मिळत आहे. बाबांना पाहून प्रत्यक्ष देव पाहिल्यासारखे वाटते आहे. बाबांची बोलण्याची पद्धत मलाही आवडते. बाबांशी थेट बोलल्यासारखे वाटते. ते पाहून खूप आनंद होतो. - जगदीश, भक्त
हे बाबा शिर्डीतील साईबाबांसारखे गुरु, देव आणि जिवंत स्वरूपातील रूप आहेत. उत्तर शिर्डीतील चिनागडीच्या साई मंदिरात साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भक्त येतात. रोबोटिक बाबांची रचना ए.यू. फाइन आर्ट्सचे विद्यार्थी रविचंद यांनी तीन वर्षांच्या मेहनतीनंतर केली आहे. त्यानंतर मूर्तीला येथे स्थापित करण्यात आले आहे. देशांतर्गत आणि परदेशी ज्ञानाची भर घालून हा रोबोटिक साई येथे स्थापित करण्यात आला आहे. - साईबाबा मंदिराचे पुजारी