जयपूर (राजस्थान) - आपले आयुष्य सुखकर बनविण्यासाठी यंत्रांचे मोठे योगदान आहे. सध्या यंत्राच्या रुपात रोबोटीक टेक्नॉलॉजी समोर येत आहे. जयपूरच्या एका तरुणाने असाच एक रोबोट तयार केला आहे. जो संरक्षण, बचाव व अग्निशमनासह शेतातील कामासाठीही उपयोगाचा ठरू शकतो.
हा रोबोट सर्व प्रकारच्या भूभागावर चालू शकतो. या बहुउपयोगी रोबोटचे नाव xena 5.0 आहे. भुवनेश मिश्रा या तरुणाने या रोबोटचे निर्माण केले आहे. तो 'ईटीव्ही भारत'शी बातचित करताना म्हणाला, मेक इन इंडियाच्या संकल्पनेतून या रोबोटची निर्मिती केली आहे. या रोबोटमध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रात्रे लावली जाऊ शकतात. तसेच हा रोबोट बॉम्बही निकामी करू शकतो.
बचाव व मदत कार्यात ठरू शकतो उपयुक्त
आपत्ती व्यवस्थापनावेळी बचाव व मदत कार्यात हा रोबोट उपयुक्त ठरू शकतो, असा दावा भुवनेश मिश्राने केला आहे. गल्ली-बोळात अग्नीशमन यंत्र म्हणूनही याचा वापर करता येऊ शकतो. याची निर्मिती शेती कार्याल समोर ठेवून करण्यात आली आहे. हा रोबोट कोणत्याही प्रकारच्या भूपृष्ठावर सहज चालू शकतो. 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत हो रोबोट चढू शकतो व सुमारे 250 किलोग्रॅम वजनही उचलू शकतो.
एसयूव्ही वाहन ओढू शकतो इतकी क्षमता
एका एसयूव्ही वाहन ओढण्याची क्षमता या रोबोटमध्ये आहे. सुमारे 300 मीटर अंतरावरून या रोबोटला कंट्रोल आपण करू शकतो. सध्या याचा वापर फायर फायटर म्हणजे अग्निशमनासाठी करण्यात येत आहे. लवकरच संरक्षणासाठीही याला उपयोगात आणण्यात येईल, असे भुवनेशचे म्हणणे आहे.
xena 5.0 ची वैशिष्ट्ये
हा एक मल्टी सरफेस क्रॉलर रोबोट आहे म्हणजेच हा कोणत्याही प्रकारच्या भूपृष्ठावर चालू शकतो. याला तयार करण्यासाठी सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च येतो. हा रोबोट एका चार्जमध्ये 3 तास काम करु शकतो. यामध्ये कॅमेरा आणि फायर मॉनिटर लावण्यात आला आहे. हा रोबोट डिफेंस, रेस्क्यू, फायर फाइटिंग आणि कृषी संबंधित इतर कामांसाठी उपयुक्त ठरू शकतो.
IOCL अग्निकांडचे उदाहरण
भुवनेश म्हणाला की, जयपूरमध्ये काही वर्षांपूर्वी आईओसीएल अग्निकांडच्या वेळी घटनास्थळी निर्माण झालेल्या उष्णतेमुळे अग्नीशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचण निर्माण होत होती. xena 5.0 हा रोबोट अशा घटनेतही उपयोगाचा ठरू शकतो.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एक उत्तम पर्याय
या रोबोटमध्ये फायर फाइटिंग सिस्टम लावण्यात आले आहे. दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांमुळे आगीच्या घटनेत वाढ होते. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा रोबोट एक उत्तम पर्याय ठरू शकतो, असा दावाही भुवनेशने केला आहे.
हे ही वाचा - बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू; दोन जण गंभीर