बारमेर(राजस्थान) - राजस्थान राज्यातील बारमेर जिल्ह्याच्या चौहान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. यामध्ये बीएसएफचे दोन जवान शहीद (BSF Vehicle Accident) झाले आहेत. तर अपघातात जखमी झालेल्या अन्य 5 जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. बाडमेर-चौहाटण रस्त्यावर शुक्रवारी सीमा सुरक्षा दलाचे वाहन आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
दोन जवान शहीद - हा अपघात इतका भीषण होता की दोन बीएसएफ जवानांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी अपघातात जखमी झालेल्या जवानांना ग्रामस्थांच्या मदतीने आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तेथे 4 जखमी जवानांची गंभीरता पाहून त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी सीमा सुरक्षा दलाचे वाहन आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली होती.
चार जवानांची तब्येत गंभीर - अपघाताची माहिती मिळताच चौहान उपविभागीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली, बीएसएफच्या अधिकाऱ्यांसह बारमेरचे जिल्हाधिकारीही रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमी जवानांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासोबतच वैद्यकीय अधिकाऱयांना चांगले उपचार करण्याच्या सूचना केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली जखमींची विचारपूस - जिल्हाधिकारी लोक बंधू यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दलाच्या 83 व्या कोरचे जवान बारमेरच्या दिशेने येत होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. या घटनेत बीएसएफचे दोन जवान शहीद झाले. अपघातात जखमी झालेल्या चार जवानांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर दोन जवानांना चांगल्या उपचारांसाठी जोधपूरला रेफर करण्यात आले आहे.