हिंदू धर्मात महिलांसाठी अनेक प्रकारचे उपवास आहेत. त्याचबरोबर असेच एक व्रत ऋषीपंचमीचा Rishi Panchami 2022 देखील आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी, ऋषीपंचमी व्रत केले जाते. यावेळी हे व्रत गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी आहे. या व्रतामध्ये प्रामुख्याने सप्त ऋषींची पूजा केली जाते. धार्मिक ग्रंथानुसार मासिक पाळीच्या काळात कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागण्यासाठी, महिलांकडून हे व्रत पाळले जाते. परशुराम आणि विश्वामित्र असे सात ऋषी अमर आहेत. सनातन धर्मात पूर्वी स्त्री आणि पुरुष दोघेही हे व्रत पाळत असत. मात्र बदलत्या युगात आता फक्त महिलाच हे व्रत ठेवतात. chant this mantra you will get all success and prosperous Rushi Panchami. Rushi Panchami Katha in marathi
सप्तऋषी पूजेचा मंत्र आणि अर्थ - 'कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतम: | जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:| दहन्तु पापं सर्व गृहन्त्वर्ध्यं नमो नम: | अर्थ - हे कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वमित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ तुम्ही सर्व ऋषिमुनींनो, माझ्याकडून अर्पण केलेला अर्घ्य स्वीकारा आणि तुमची कृपा सदैव माझ्यावर ठेवा. या श्लोकामध्ये कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, वसिष्ठ ऋषिंची नावे सांगितली आहेत. त्यांच्या नामस्मरणाने सर्व पाप कर्म नष्ट होतात. तसेच या दिवशी गरीब, गरजूंना दान करण्याला एक विशेष महत्त्व आहे.
ऋषी पंचमीचा उपवास - भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी, ऋषी पंचमीचा उपवास केला जातो. यंदाच्या वर्षी ऋषी पंचमीचा उपवास हा 1 सप्टेंबर 2022 गुरुवार रोजी आहे. म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आणि हरतालिका तृतीयेच्या तिसऱ्या दिवशी. ऋषी पंचमीच्या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते. महिलांसाठी ऋषी पंचमीच उपवास फार महत्त्वाचा मानला जातो. ऋषीपंचमीच्या दिवशी जर महिला हा उपवास करतील तर सर्व दोषांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. महिलांकडून कळत नकळत काही चूक झाली असेल, तर हे व्रत पाळल्यास सर्व दोषांपासूनही मुक्ती मिळते. हिंदू धर्मात या व्रताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. जाणून घेऊयात ऋषी पंचमीच्या दिवशी, कोणत्या मंत्राचा जप करावा आणि हे व्रत करणाऱ्या महिलांनी काय करू नये.
महिलांनी हे करू नये - असे मानले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत करणाऱ्या महिलांनी जमिनीवर पेरलेले कुठलेही अन्यधान्य त्या दिवशी खाऊ नये. उपवासा दरम्यान हातसडीचा तांदूळ खावा. याशिवाय फळे-शाकाहारी पदार्थ खावे. मासिक पाळीच्या काळात हे व्रत महिलांनी करू नये. ऋषीपंचमी हा सण हिंदू धर्मात (Hinduism) महिलांसाठी (women) खूप महत्त्वाचा मानला जातो. ऋषीपंचमी (Rishi Panchami) हा सण दरवर्षी भाद्रपदाच्या (Bhadrapada) शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा ऋषीपंचमी (Rishi Panchami) १ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी सप्तऋषींची पूजा करण्याचा नियम आहे.
सात ऋषींची पूजा - हिंदू पंचांगानुसार, (Hindu Panchang) अनेक महत्त्वाचे दिवस आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऋषिपंचमी. या वर्षी 1 सप्टेंबरला ऋषिपंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवसांमध्ये सात ऋषींची पूजा केली जाते. विशेषत: महिला हे व्रत करतात.समजून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत हिंदू धर्मात (Hindu Religion) ऋषिपंचमीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. सप्तऋषींच्या पूजेसाठी दुपारची वेळ शुभ असल्याचे मानले गेले आहे. 1 सप्टेंबरला भाद्रपद शुक्ल पक्षातली पंचमी (Bhadrapad Shukla Panchami) तिथी आणि गुरुवारचा दिवस असा शुभ योग आहे. पंचमी तिथीची सुरूवात 31 ऑगस्टला रात्री 3 वाजून 22 मिनिटांनी होईल. त्यामुळे दुपारी 2 वाजून 49 मिनिटांच्या आधी ऋषिपंचमीची पूजा केली पाहिजे.
मंत्रांचा जप करावा - ऋषिपंचमीच्या दिवशी दुपारी सप्त ऋषी (Seven Sages) म्हणजे मरिची, वसिष्ठ, अंगिरा, अत्री, पुलत्स्य, पुलह आणि क्रतु: यांची पूजा केली जाते. हे व्रत करणाऱ्या महिलांनी सूर्योदयाच्या वेळी घराची पूर्ण स्वच्छता करावी व स्नान करून नवीन वस्त्र परिधान करावी. त्यानंतर देवघरात आसनावर बसून हळद, कुंकवाचे चौकोनी मंडले तयार करावी. यानंतर सप्त ऋषींची स्थापना करावी. त्यानंतर पंचामृत व गंगाजल (Gangajal) शिंपडावे. यावर चंदनाचा टिळा लावून फुलमाळा व वस्त्र, जानवं अर्पण करावे. पूजा पूर्ण झाल्यानंतर सप्तऋषींना फळ आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर दिवा लावून आरती करावी व सप्तऋषींच्या पूजा मंत्रांचा जप करावा.
सप्तर्षी पूजन मंत्र - कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः। जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः ।दहन्तु पापं सर्व गृह्नन्त्वर्ध्यं नमो नमः। हा सप्तर्षी पूजन मंत्र आहे. ऋषिपंचमीचे व्रत करताना, उपास करायचा असतो पण तुम्ही फळे खाऊ शकता. हिंदू धर्मशास्त्रांत ऋषिपंचमीच्या व्रताचे खूप महत्त्व सांगितले गेले आहे. हिंदू धर्मात मासिक पाळीच्या वेळी (Menstrual Cycle) महिलांना घरातील एखादे पवित्र कार्य करण्यास मनाई असते. पण समजा महिला देवघर स्वच्च करताना किंवा पवित्र कार्य करतानाच जर, तिला पाळी आली तर तिला अपराधी वाटते. वर्षभरात चुकून असे घडले असेल, तर त्या महिलेला पापक्षालन करण्यासाठी ऋषीपंचमी हा एकच दिवस असल्याचे मानले गेले आहे. त्या महिलेने सप्तर्षींची पूजा आणि हे व्रत केल्याने तिचे पापहरण होते, असे मानले जाते. chant this mantra you will get all success and prosperous Rushi Panchami. Rushi Panchami Katha in marathi
हेही वाचा Ganeshotsav 2022 स्टँडिंग गणेश मुंबईतील नरे पार्कचे वैशिष्ट्य, सार्वजनिक गणेशोत्सवाचे 76 वर्षे