ETV Bharat / bharat

Rishabh Pant Love Story : अपघातानंतर ईशानेच घेतली पंतची काळजी, जाणून घ्या कोण आहे ऋषभ पंतची ड्रीम गर्ल! - ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. मात्र आता तो वेगाने बरा होत आहे. या कठीण काळात त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीने पंतला प्रत्येक क्षण साथ दिली आहे. अपघात झाल्यापासून आतापर्यंत ईशा पंतची काळजी घेत आहे. यासोबतच ती पंतशी संबंधित प्रत्येक अपडेट त्याच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवते आहे.

Rishabh Pant Love Story
ऋषभ पंत प्रेमकथा
author img

By

Published : Feb 12, 2023, 9:00 AM IST

डेहराडून : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत आता दुखापतीतून झपाट्याने बरा होत आहे. मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ऋषभ पंतने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो क्रॅचच्या साहाय्याने उभा असल्याचे दिसत आहे. हे 2 महिने ऋषभ पंतसाठी खूप कठीण होते, पण या काळात त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीने त्याची रात्रंदिवस काळजी घेतली.

ईशा ठेवते चाहत्यांना अप टू डेट : अपघातानंतर ऋषभ पंतच्या फॅन्सना ऋषभच्या प्रकृतीची चिंता होती. या दरम्यान कोणी ऋषभच्या प्रत्येक क्षणाच्या बातम्या आणि त्याच्या प्रकृतीशी माहिती चाहत्यांना शेअर करत असेल तर ती ईशा नेगी होती. ती तिच्या ट्विटर अकाउंटवर पंतशी संबंधित प्रत्येक माहिती अपडेट करत होती. या ट्विटर अकाऊंटवरून दररोज ऋषभबद्दलचे एक ना काही अपडेट पोस्ट केले जात होते. ऋषभ पंतबाबत डॉक्टरांचा काय सल्ला आहे आणि ऋषभ पंत कधी मैदानात परतणार आहे, अशा सगळ्या पोस्ट्स तिच्या ट्विटर हँडलवर सतत पोस्ट केल्या जात होत्या. तुकताच पंतने जेव्हा त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचा फोटो पोस्ट केला, त्यावेळीही ईशाने त्यावर कमेंट करून फायटर असे लिहिले. त्यासोबत हृदयाचा एक इमोजीही पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर खूप सक्रिय : ईशा नेगी उत्तराखंडची आहे. ती डेहराडूनमध्ये लहानाची मोठी झाली आहे. ईशा तेव्हा प्रसिद्धीझोतात आली जेव्हा ऋषभ पंतने 2020 मध्ये तिच्यासोबत बर्फातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यानंतर ईशा नेही हे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले. अतिशय स्टायलिश असणारी ईशा नेगी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. व्यवसायाने इंटिरियर डिझायनर असलेली ईशा तिचे अनेक व्हिडिओ सतत पोस्ट करत असते. परंतु पंतच्या अपघातानंतर तिने आत्तापर्यंत एकही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही.

आयपीएलमध्ये पहिल्यांदा दिसली : ऋषभ पंत आणि ईशा नेगी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ईशा 2022 मध्ये आयपीएल मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. भारतीय क्रिकेट संघ परदेश दौऱ्यावर असताना ईशा नेगी तिच्या ग्लॅमरस लुकसह त्या शहरातील अनेक व्हिडिओ पोस्ट करत असे. मात्र मालिकेदरम्यान हे दोघे कधीही एकत्र दिसले नाही किंवा त्यांचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ समोर आला नाही.

अनेकदा प्रेम व्यक्त केले : ऋषभ पंतने यापूर्वीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे ईशावरील प्रेम व्यक्त केले आहे. जेव्हा ऋषभ पंतने त्याची गर्लफ्रेंड ईशासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने लिहिले होते, 'जेव्हाही मी तुझ्यासोबत असतो तेव्हा मला बरे वाटते', यानंतर हा फोटो ईशा नेही रिट्विट केला होता. या आधी 2019 मध्ये देखील ऋषभ पंतने ईशा नेगीचा एक फोटो पोस्ट केला होता आणि लिहिले होते, 'मला फक्त तुला आनंदी ठेवायचे आहे'. हा फोटो शेअर केल्यानंतर ईशाने लिहिले होते, 'माझा साथीदार, माझा आत्मा, माझा सर्वात चांगला मित्र' 'लव्ह ऑफ माय लाईफ'. ऋषभ पंत आणि ईशा नेगी दोघेही एकमेकांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पोस्टवर अनेकदा कमेंट करतात.

ऋषभसोबत उर्वशीचे नाव जोडले : ऋषभ पंत आणि ईशा नेगी यांच्यात बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नावही समोर आले. मात्र, उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्याबाबत ज्या काही चर्चा झाल्या, त्या फक्त उर्वशी रौतेलाच्याच होत्या. असेही म्हटले जात होते की जेव्हा उर्वशी रौतेला ऋषभ पंतबद्दल दिसू लागली, तेव्हाच ऋषभ पंतने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. असे असूनही, उर्वशी रौतेलाने अनेकदा मंचांवर पंतबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

सामन्यादरम्यान उर्वशीवर सर्वांच्या नजरा : आजही क्रिकेट सामन्यात ऋषभ पंत फलंदाजी करत असताना कॅमेरामनचा कॅमेरा उर्वशी रौतेला आणि तिच्या प्रतिक्रिया टिपण्यात व्यस्त असतो. जेव्हा ऋषभ पंतचा अपघात झाला त्यावेळी उर्वशी रौतेलानेही पोस्ट करून ऋषभ पंतसाठी प्रार्थना केली होती आणि त्याच्या हॉस्पिटलबाहेरचा फोटो पोस्ट करून तिने ऋषभ पंतबद्दल तिला काय वाटते हेही व्यक्त केले होते. उर्वशी देखील उत्तराखंडच्या कोटद्वारची आहे आणि तिचे कुटुंब देखील तिथेच राहते.

अपघातानंतर ईशा पंतसोबत : अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतला जेव्हापासून मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले, तेव्हापासून ऋषभ पंतच्या चाहत्यांना ईशा नेगीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून झटपट बातम्या मिळत होत्या. ज्या वेळी ऋषभ पंतला डेहराडूनहून मुंबईला हलवले जात होते, त्यावेळी देखील ईशा हॉस्पिटलच्या आसपास दिसली होती. ईशा नेगी या कठीण काळात सतत ऋषभ पंतसोबत असल्याचे बोलले जात आहे. ऋषभ दुखापतीतून झपाट्याने सावरत आहे. 2023 च्या अखेरीस तो पुन्हा मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा : Womens T20 World Cup : स्मृती मानधना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला मुकणार, हे आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.