गोवा : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून सुरू ( Political crisis in Goa ) असणाऱ्या काँग्रेस आमदाराच्या बंडावर ( The revolt of Congress MLAs ) अखेर आज पडदा पडला. काँग्रेसचे सर्व बंडखोर आमदार आज पुन्हा पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत दाखल झाले. त्यांनी आपण काँग्रेस सोबत असल्याचे सांगत आपण यापुढेही पक्षासोबत राहणार असल्याचे सांगितले. ( Revolt of Congress MLAs Stopped Today )
आमदारांनी केलेले बंड अखेर शमले : मागच्या दोन दिवसांपासून काँग्रेसच्या एका गटाने पक्षाविरोधात बंड करून भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजप पक्षप्रवेशासाठी पुरेसे संख्या बळ नसल्यामुळे या आमदारांना अखेर माघार घेत पुन्हा पक्षात परताव लागले. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह दिलायला लोबो, केदार नाईक आणि राजेश फळदेसाई यांनी पक्षाविरोधात बंड केले होते. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन तृतीयांश आमदारांची संख्या कमी पडल्यामुळे या आमदारांना माघार घेऊन अखेर पुन्हा पक्षात माघारी यावे लागले.
काँग्रेसने दिला होता कायदेशीर कारवाईचा इशारा : याआधी 2019 साली दहा जुलैला काँग्रेसच्या 15 आमदारांपैकी दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, त्याची पुनरावृत्ती काल दहा जुलै 2022 ला होणार होती. राज्यात अशी तयारीही सुरू झाली होती. विरोधी पक्ष नेते माइकल लोबो यांनी यासाठी पुढाकार घेऊन या आमदारांना भाजपमध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुरेशी संख्या नसल्यामुळे या आमदारांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले. आपले आमदार भाजपात प्रवेश करतात यासाठी काँग्रेसनेही प्रयत्न सुरू करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. तर काहींना कायदेशीर कारवाई करायचा इशारा दिला होता.
रविवारी रात्री उशिरापर्यंत चालले होते नाट्य : रविवारी रात्री काँग्रेसचे काही आमदार फुटुन भाजपच्या मार्गावरती होते. मात्र, यावेळी काँग्रेसने वेळीच पावले उचलून, त्या आमदारांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. या सर्व नाट्याचे पुढारी मायकल लोबो यांन रात्री अचानकपणे विरोधी पक्षनेते पदावरून हटवण्यात आले होते. तर दिगंबर कामत यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा राज्याचे निवडणूक प्रभारी दिनेश गुंडुराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितला होता.
मायकल लोगो म्हणाले, आम्ही पक्षासोबतच आहोत : मागच्या दोन दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, आम्ही वेळोवेळी पक्षासोबतच राजकीय बैठका केल्या. मात्र, असे का घडले याबद्दल मला कल्पना नाही. मला आणि माझ्या कुटुंबावर तसेच माझ्या व्यवसायावर अनेक वेळा भाजप सरकारकडून राजकीय आघात करण्याचा प्रयत्न झाले, त्यामुळे मी थोडासा नरवस होतो. त्यामुळे मी विरोधी पक्षनेते पदामध्ये खूश नव्हतो म्हणूनच पक्षाने मला विरोधी पक्षनेते पदावरून हटवले असल्याचे मायकल लोबो यांनी सांगितला.
मी अद्यापही पक्षात नाराज : मी माझ्या कारकिर्दीत काँग्रेस पक्षाला भरभरून दिले. अनेक वर्षे काँग्रेसची सेवा केली, पक्ष वाढवला, पण मागच्या काही महिन्यात काँग्रेसने मला वेळोवेळी अडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी पक्षात नाराज असून, मी याची नाराजी पक्षश्रेष्ठींना कळविली आहे, असे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी सांगितले.
हेही वाचा : Goa Political Crisis : काँग्रेसचे बंड रोखण्यासाठी मुकुल वासनिक आज गोव्यात दाखल होणार
हेही वाचा : Michael Lobo : विरोधी पक्षनेते पदावरून मायकल लोबोंची हकालपट्टी; माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतांवर कारवाई