जयपूर - राजस्थानच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Minister Ashok Gehlot) यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे. या बैठकीत सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत.
ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात येणार आहे, त्यांचे राजीनामे राजभवनला पाठविण्यात येणार आहेत. इतर मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री अशोक गेहलोत स्वत:जवळ ठेवणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीला राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन (Ajay Maken) हेदेखील उपस्थित राहिले.
हेही वाचा-Swachh Survekshan 2021 : सलग पाचव्यांदा 'इंदूर' नंबर वन, महाराष्ट्रातील दोन शहरे पहिल्या पाचमध्ये
गेहलोत मंत्रिमंडळासमोर हे आहे सर्वात मोठे आव्हान-
यापूर्वी गेहलोत मंत्रिमंडळात 13 जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व मिळाले नव्हते. या जिल्ह्यांना स्थान देणे ( Rajsthan cabinet reshuffle) हे काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान आहे. शिक्षण मंत्री गोविंद डोटासरा (govind Dotasara) , आरोग्य मंत्री रघु शर्मा (health Minister Raghu Sharma) आणि महसूल मंत्री हरीश चौधरी (Harish Chaudhary) यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करणारा कोणताही मंत्री नाही.
तीन मंत्र्यांनी यापूर्वीच दिला राजीनामा
काँग्रेसचे नेते माकन यापूर्वीच म्हणाले, की आरोग्य मंत्री रघु शर्मा (Raghu Sharma), शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा (Govind Singh Dotasara) आणि महसूल मंत्री हरीश चौधरी (Harish Choudhary) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शविणारे पत्र ( Rajasthan three cabinet ministers resigned) लिहिले आहे. हे पत्र राजीनामा मानले जात आहे. या नेत्यांना काँग्रेसने नवीन जबाबदारी सोपविली आहे.