मकर संक्रांत हा सण सनातन धर्मातील प्रमुख सण मानला जातो. जेव्हा सुर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला साजरा होत आहे. ज्योतिष्यशास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला 'मकर संक्रांत' म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान आणि दान करणे, अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केलेले गंगास्नान हे महास्नान असल्याचे मानले जाते. तसेच या दिवशी खिचडी खाण्याला विशेष महत्व आहे.
का खल्ली जाते खिचडी : ज्योतिष्यशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी हे मुख्य अन्न मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून या दिवशी खिचडी खाणे खूप शुभ असते. यातुन सर्व त्रास दूर होतात. याशिवाय खिचडीचा संबंध अनेक ग्रहांशी जोडला गेला आहे. खिचडीमध्ये वापरण्यात येणारा भात हा चंद्राशी संबंधित आहे. खिचडीत टाकली जाणारी उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित आहे. खिचडीतील तूप सूर्यदेवाशी संबंधित आहे. म्हणुनच मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे खूप महत्वाचे मानले जाते. या दिवशी खिचडी खाण्याबरोबरच दान करणे देखील तेवढेच महत्वाचे सांगितलेले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि उडीद डाळ दान केली जाते, असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.
असे आहे महत्व : शेतात नवीन तांदूळ निघाल्यानंतर प्रथम तो सूर्यदेवाला अर्पण करण्याची प्रथा आहे. असे केल्याने सूर्यदेवाचा आर्शिवाद मिळतो, असे सांगितले जाते. या दिवशी सूर्यासोबतच भगवान विष्णुची देखील पूजा केली जाते. मकर संक्रांतीला तांब्याच्या भांड्यात पाणी भरुन त्यात गूळ आणि गुलाबाची पाने टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले जाते. या दिवशी गूळ, तीळ आणि खिचडीचे सेवन करणे देखील शुभ मानले जाते.
इतरही पदार्थांचे आहे महत्व : मकर संक्रातीच्या दिवशी खिचडी बरोबरच तिळ, शेंगदाणे आणि गूळ टाकुन बनविलेला तिळगूळ खाण्याचे देखील विशेष महत्व आहे. या दिवसांमध्ये हिवाळा ऋतु असतो आणि अश्या दिवसांमध्ये थंडीपासुन शरीराचा बचाव करण्यासाठी स्निग्ध पदार्थांची गरज असते. तेव्हा तिळगूळ खल्ल्याने शरीराला आतुन ऊर्जा मिळते, आणि थंडी पासुन शरीराचे व आरोग्याचे रक्षण होत असते. तसेच तिळापासुन तयार केलेले अनेक पदार्थ जसे तिळाचा गजक, तिळाचे लाडू, रेवडी, इत्यादी अनेक पदार्थ हे परंपरा आणि स्थानिक चालिरिती नुसार तयार केले जातात आणि त्याचा समावेश आहारात केला जातो.