ETV Bharat / bharat

...म्हणून कुटुंबीयांनी प्रेयसीच्या घरासमोरच प्रियकरावर केले अंत्यसंस्कार

author img

By

Published : Jul 25, 2021, 10:55 AM IST

Updated : Jul 28, 2021, 1:15 PM IST

प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराच‍ी निर्घृण हत्या केल्याची घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये घडली आहे. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी प्रेयसीच्या घरासमोरच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

मुझफ्फरपूर
muzaffarpur

पाटणा - प्रेमाची हीच विटंबना आहे, की जीच्या दारी त्याने लग्नाची वरात घेऊन जाण्याचे आणि सप्तपदी घेण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याच दारात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये प्रियकराच्या मृतदेहावर प्रियसीच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

रामपूर शाह गाव रहिवासी सौरभ कुमार नावाचा तरुण सोनरबरसा गावातील मैत्रीणीला भेटण्यासाठी गेला होता. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना त्यांना रंगेहाथ पकडलं. संतप्त मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. एवढेच नाही, तर त्यांनी त्याचे गुप्तांग कापले. यानंतर आरोपींनी त्याला उचलले आणि मुझफ्फरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सौरभच्या कुटुबीयांना याची माहिती मिळाल्यानंतर ते रुग्णालयात येईपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर तरुणाचे कुटुंबीय संतप्त असून गावातील वातारवण तापलं आहे. तरुणाच्या कुटुबीयांनी आरोपींच्या घरासमोरच चिता तयार केली आणि सौरभवर अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी त्याना आडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. सहा ठाण्यातील पोलीस गावात तैनात करण्यात आले होते.

तरुणाच्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. सौरभच्या काकाने पत्रकारांशी बोलताना, प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. सौरभाच्या कुटुंबीयांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ हा ओडिशामधील एका खासगी कंपनीत कामाला होता. या महिन्याच्या 1 जुलै रोजी तो आपल्या बहिणीच्या लग्नासाठी रजेवर त्याच्या घरी आला होता. घटनेनंतर गावातील वातावरण तणावग्रस्त आहे. मोठ्या संख्येने पोलीस दल गावात तळ ठोकून आहेत.

Last Updated : Jul 28, 2021, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.