ETV Bharat / bharat

Gautam Adani : मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही याची खंत - अदानी - Vidya Mandir Trust Palanpur

जगातील श्रीमंत उद्योगपतींमधील तीसचे व्यक्ती गौतम अदानी यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही याची खंत व्यक्त केली आहे. गुजरातमधील विद्या मंदिर ट्रस्ट पालनपूरला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज रविवार (दि. 8 जानेवारी)रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Gautam Adani ) या कार्यक्रमात त्यांनी जीवनाशी संबंधित अनेक पैलूंवर भाष्य केले. पहिल्यांदा कमिशन म्हणून मिळालेले सुमारे 10,000 रुपये हे आयुष्यातील प्रेररणादाई होते असही ते यावेळी म्हणाले आहेत.

Gautam Adani
उद्योगपती गौतम अदानी
author img

By

Published : Jan 8, 2023, 10:44 PM IST

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना अजूनही महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता न आल्याची खंत आहे. 1978 मध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांनी औपचारिक शिक्षण अर्धवट सोडले आणि नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले आणि आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पुढे काम केले. (Vidya Mandir Trust Palanpur in Gujarat) दरम्यान, तीन वर्षांनंतर त्यांना व्यवसायात पहिले यश मिळाले जेव्हा त्यांना जपानी खरेदीदाराला हिरे विकण्यातून 10,000 रुपये कमिशन मिळाले. यातूनच अदानी यांचा उद्योजक म्हणून प्रवास सुरू झाला आणि आज ते जगातील तिसरे श्रीमंत उद्योजक बनले आहेत. तरीही, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू न शकल्याची खंत आपल्याला आजही आहे अस ते सांगतात. (Vidya Mandir Trust Palanpur) गुजरातमधील विद्या मंदिर ट्रस्ट पालनपूरला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.

स्वातंत्र्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवणे कठीण : बनासकांठामधील सुरुवातीच्या दिवसांनंतर, ते अहमदाबादला गेले जेथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी चार वर्षे घालवली. 'मी फक्त 16 वर्षांचा होतो जेव्हा मी माझे शिक्षण सोडून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला असही अदानी यावेळी म्हणाले आहेत. एक प्रश्न मला वारंवार विचारला जातो की, मी मुंबईला का गेलो आणि माझ्या कुटुंबासोबत काम का केले नाही? तरुण हे मान्य करतील की किशोरवयीन मुलाची स्वातंत्र्याची अपेक्षा आणि इच्छा आपल्या नियंत्रणात ठेवणे कठीण आहे. मात्र, मला एवढेच माहीत होते की मला काहीतरी वेगळे करायचे आहे. आणि त्यासाठी मलाच कष्ट करायचे होते.

हिऱ्यांच्या व्यापारातील बारकावे जाणून घेतले : 'मी रेल्वेचे तिकीट घेतले आणि गुजरात मेलने मुंबईला निघालो. मुंबईत, माझे चुलत भाऊ प्रकाशभाई देसाई यांनी मला महेंद्र ब्रदर्समध्ये नोकरी दिली, जिथे मी हिऱ्यांच्या व्यापारातील गुंतागुंत शिकू लागलो. मला तो व्यवसाय लवकरच समजला आणि महेंद्र ब्रदर्ससोबत सुमारे तीन वर्षे काम केल्यानंतर मी झवेरी बाजारमध्ये स्वतःची हिऱ्यांची ब्रोकरेज सुरू केली असा अनुभवरी अदानी यांनी यावेळी सांगितला आहे.

जेव्हा पहिल्यांदा 10,000 रुपये कमिशन दिले : मला अजूनही आठवतो तो दिवस मी जपानी खरेदीदाराशी माझा पहिला करार केला होता, ज्यामध्ये मी 10,000 रुपये कमिशन घेतले होते. आणि उद्योजक म्हणून माझ्या प्रवासाची ही सुरुवात होती असही अदानी यावेळी म्हणाले आहेत.

त्याची कायम खंत वाटते : मला आणखी एक प्रश्न विचारला जातो की मी कॉलेजला गेलो नाही याची मला काही खंत आहे का? माझ्या आयुष्यावर आणि त्यात घेतलेल्या विविध वळणांवर विचार करताना, मला विश्वास आहे की मी कॉलेज पूर्ण केले असते तर मला फायदा झाला असता. माझ्या सुरुवातीच्या अनुभवांनी मला हुशार बनवले, पण आता मला समजले आहे की औपचारिक शिक्षणामुळे एखाद्याच्या ज्ञानाचा झपाट्याने विस्तार होतो. त्यामुळे माझे शिक्षण मला पुर्ण करता आले नाही यांची आजही खंत वाटते.

हे गेल्या साडेचार दशकात घडले : आज जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा कंपनी, भारतातील सर्वात मोठे विमानतळ आणि बंदर अदानी समूहाच्या अखत्यारीत आहेत. अदानी समूहाचा व्यवसाय ऊर्जा ते सिमेंट उद्योगापर्यंत पसरलेला आहे. तसेच, बाजार भांडवल US$ 225 अब्ज आहे. हे सर्व गेल्या साडेचार दशकात घडले आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.