ETV Bharat / bharat

Top News Today : आजच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा, एका क्लिकवर

विधिमंडळ अधिवेशनाचा 9 वा दिवस, ( Today 9th day of the legislative session ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हैदराबाद दौऱ्यावर ( President Draupadi Murmu visits Hyderabad ) आहेत. यासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर ( Top News Today In Marathi ) .

Top News Today
महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
author img

By

Published : Dec 29, 2022, 7:22 AM IST

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल ( MP Praful Patel on tour of Bhandara district ) भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. ( Top News Today In Marathi )

  • विधिमंडळ अधिवेशनाचा आज 9 वा दिवस : विधिमंडळ अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. ( Today 9th day of the legislative session ) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यावर चर्चा होणार आहे.
  • मुंबईत अशोक नायगावकर यांचा सत्कार : साहित्य आणि व्यक्ती या कार्यक्रमात अशोक नायगावकर यांचा सत्कार आणि पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला श्रीनिवास पाटील, सुशीलकुमार शिंदे, आशिष शेलार, राज ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
  • सोलापुरात सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन : सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज होणार आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये महत्त्वाचे आकर्षण म्हणजे दीड टन वजनाचा आणि एक कोटी किंमतीचा गजेंद्र नामक रेडा पाहायला मिळणार आहे. यामध्ये 200 पेक्षा अधिक कंपन्या सहभाग घेणार आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
  • हॉकर्स युनियनच्या वतीने मोर्चा : अहमदनगर हॉकर्स युनियनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजय झिंजे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आज सकाळी 11 वाजता अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हॉकर्स युनियनच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
  • राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन : महाराष्ट्र कामगार मंडळातर्फे अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात आज राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार असून सकाळी 11 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मागील 27 वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात असून राज्यभरातील 225 कलावंत या स्पर्धेसाठी आपली हजेरी लावणार आहेत.
  • खासदार प्रफुल्ल पटेल भंडारा जिल्हा दौऱ्यावर : ( MP Praful Patel on tour of Bhandara district ) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजता भंडारा शहरातील बावने कुणबी सभागृहात आयोजित पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित रहाणार आहेत.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हैदराबाद दौऱ्यावर : ( President Draupadi Murmu visits Hyderabad ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज हैदराबादमध्ये जी नारायणम्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, बीएम मलानी नर्सिंग कॉलेज आणि सुमन ज्युनियर कॉलेज ऑफ वुमन एफिशिएन्सी सोसायटीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधतील. शमशाबाद येथील श्रीरामनगरम येथे असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’लाही त्या ( Statue of Equality ) भेट देणार आहे.
  • तुनिषाच्या शर्मा नातेवाईकांचे जबाब नोंदवणार : अभिनेत्री तुनिषाची ( Actress Tunisha suicide case ) मावशी, मामा आणि दोन चालकांचे जबाब वालीव पोलिस नोंदवणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.