ETV Bharat / bharat

Top News Today : फक्त एका क्लिकवर ; आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा - Ambadas Danve Osmanabad Visit

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (Read Top News Today )

Top News Today
महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
author img

By

Published : Oct 30, 2022, 6:56 AM IST

मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा मोदींच्या हस्ते ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पाचे उद्घाटन, रॉबर्ट वाड्रा शिर्डी आणि सिद्धिविनायक दर्शनाला, किरीट सोमैय्यांची पत्रकार परिषद, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना, नाशिकमध्ये छटपूजा, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात मेळावा, संभाजीराजेंचा नाशिक दौरा, अंबादास दानवेंचा उस्मानाबाद दौरा या विशेष घडामोडी (Marathi News) आहेत.

आज मोदींच्या हस्ते ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पाचे उद्घाटन (Transport aircraft project inaugurated by Modi today) :फॉक्सकॉन-वेदांता'नंतर आता आणखी एक महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूर येथे होणारा C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. गुजरातमध्ये वडोदऱ्याला हा प्रकल्प होणार असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी आज मन की बात करणार आहेत. सकाळी 11 वाजता मन की बात का कार्यक्रम होईल.

आज रॉबर्ट वाड्रा शिर्डी आणि सिद्धिविनायक दर्शनाला (Robert Vadra Shirdi and Siddhivinayak visit today) : रॉबर्ट वड्रा आज शिर्डी आणि सिद्धिविनायकाला भेट देणार आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज शिर्डीच्या दर्शनाला सकाळी 11 वाजता आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दुपारी दीड वाजता जाणार आहेत.

आज किरीट सोमैय्यांची पत्रकार परिषद (Kirit Somaiya press conference) : आज किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद आहे. ते आज एसआरए घोटाळ्याची कागदपत्रे प्रसिद्ध करण्यासाठी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना ( T-20 World Cup India Vs South Africa ) : टी- 20 विश्व चषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना होणार आहे. दोन सामने जिंकत भारतीय संघ आपल्या गटात पहिल्या स्थानावर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होणार आहे.

आज नाशिकमध्ये छटपूजा (Chhat Puja Nashik) : आज नाशिकमध्ये छटपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर रामकुंड परिसरात छठपूजेचा संगीत कार्यक्रम देखील पार पडणार आहे. जवळपास ३० हजार भाविक हजेरी लावतील असा आयोजकांनी अंदाज व्यक्त केला आहे. कार्यक्रम संध्याकाळी 5.30 वाजता होईल.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात मेळावा (NCP meeting in Pune) : आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात मेळावा पार पडणार आहे. खासदार सुप्रिया सुळे या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.

आज संभाजीराजेंचा नाशिक दौरा (Sambhaji Raje Nashik visit) : आज संभाजीराजे छत्रपती नाशिक दौऱ्यावर आहेत. गाव तेथे शाखा व घर तेथे स्वराज्य अभियानांतर्गत छत्रपती संभाजीराजे सकाळपासून ईगतपुरी तालुक्यात 26 शाखांचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

अंबादास दानवेंचा उस्मानाबाद दौरा (Ambadas Danve Osmanabad Visit) : आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते कैलास पाटील यांचीही भेट घेणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.