ETV Bharat / bharat

Top News Today : आजच्या महत्त्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा ( Maharashtra Winter Session fourth day ) आज चौथा दिवस आहे. अधिवेशनादरम्यान 12 मोर्चे निघणार आहेत. (Top News Today in Marathi) चीनमध्ये कोरोनाचा धोका ( Corona threat in China ) वाढल्यामुळे देशात आणि राज्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ( Meeting with Chief Minister ) होणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या आढावा वाचा एका क्लिकवर ( Read Important Top News ).

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या बातम्या
author img

By

Published : Dec 22, 2022, 8:36 AM IST

मुंबई : राज्यात पुन्हा मास्क बंदी? : चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढल्यामुळे देशात आणि राज्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत ( Health Minister Tanaji Sawant Meeting ) यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यात राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार का? इतर राज्यातून विमानातून येणाऱ्या प्रवाशांनी टेस्ट सक्ती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • नवनीत राणा कोर्टात हजर राहणार का? : शिवडी दंडाधिकारी कोर्टात नवनीत राणा ( Navneet Rana case ) यांच्याविरोधात दाखल बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Sessions Court ) राणा आणि त्यांच्या वडिलांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच त्यांच्याविरोधात जारी अजामानपात्र वॉरंटही रद्द करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आज नवनीत राणा शिवडी कोर्टात हजर राहणार का?
  • विधीमंडळ अधिवेशनात12 मोर्चे : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज 12 मोर्चे निघणार आहेत. यातला पोलीस पाटील संघटनेचा मोर्चा महत्वाचा असणार आहे. कोकणातील रिफायनरी विरोधक आज नागपुरात एक दिवसाच आंदोलन केले जाणार आहे. सरकारने मांडलेल्या 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत.
  • घोड्यांची शर्यत : सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हल मध्ये आज घोड्यांची शर्यत होणार आहे. घोड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारो अश्व शैकिन दाखल होणार आहे. दीडशेहून अधिक अश्व यात सहभागी होणार आहेत.
  • माळेगावची यात्रा : श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगावची यात्रा आजपासून सुरू होणार आहे. दुपारी 2 वाजता शासकीय पूजा करून यात्रेला सुरूवात होईल. देशभरातील विविध राज्यातून घोडा, गाढव, उंट, कुत्रा, मांजर, बैल, गाय म्हैशी घेऊन व्यापारी यात्रेच्या बाजारात सहभागी होतात.
  • दिल्ली सरकार अलर्ट : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार अलर्ट झालेय. अरविंद केजरीवा यांनी आपतकालीन बैठक बोलवली आहे.
  • कोरोनासंदर्भात बैठक : यूपीचे सीएम सीएम योगी आदित्यनाथ कोरोनासंदर्भात टीम-9 सोबत बैठक बोलवली आहे.
  • अविश्वास प्रस्तावावर गोंधळ : मध्यप्रदेश विधानसभामध्ये काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर गोंधळ होण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिवराज सिंह सकाळी 11 वाजता उत्तर देणार आहेत.
  • अफताबच्या जमीनावर सुनावणी : श्रद्धा वालकर हत्याकांडातील ( Shraddha Walker murder case ) आरोपी अफताब याच्या जमीनावर साकेत कोर्टात सुनावणी होणार आहे.
  • तुरुंगातून बाहेर येणार 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज : चार्ल्स शोभराज 19 वर्षापासून नेपाळच्या तुरुंगात कैद होता. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. शोभराजला वयाच्या आधारावर सोडण्यात आले आहे. हत्येच्या आरोपाखाली तो 2003 पासून नेपाळी तुरुंगात बंद आहे. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांत त्याला हद्दपार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.