ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे, काय होणार? आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज दिवसभरात कोठे, काय होणार? देशभरसह राज्यतील महत्त्वाच्या बातम्यांचा अढावा वाचा ( Read Important Top News Today ) एक क्लिकवर. ( Top News Today )

Top News Today harat
दिवसभरात कोठे, काय होणार
author img

By

Published : Nov 17, 2022, 6:56 AM IST

मुंबई : आज दिवसभरात कोठे, काय होणार? देशभरसह राज्यतील महत्त्वाच्या बातम्यांचा अढावा वाचा ( Read Important Top News Today ) एक क्लिकवर. ( Top News Today )

उद्धव ठाकरे शिवतिर्थावर : आज बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन आहे. ठाकरे गटांचे नेते, आमदार, खासदार हे बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी संघर्ष टाळण्यासाठी शिंदे गटाने स्मृतिदिनाच्या एक दिवस आधीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी : राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निकाल आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांचे काय होणार याचे उत्तरही या सुनावणीत मिळणार आहे.

बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार लोकार्पण : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कार्यान्वित करण्यात येणा-या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) रुग्णालयाचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Maharashtra Chief Minister Eknath Shinde ) यांच्या हस्ते होणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार श्रीमती वर्षा गायकवाड, आमदार सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

अनिल अंबानींनी हायकोर्टात आज सुनावणी : रिलायन्स (एडीए) समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी ( Anil Ambani ) यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला तात्पुरता दिलासा आज संपतोय. अनिल अंबानींविरूद्ध पाठवलेल्या नोटीसवर सध्या कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश आयकर विभागाला दिले होते आपल्या स्विस बँकेतील खात्यात 814 कोटींच्या ठेवी दडवून ठेवत 420 कोटींची करचुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली आयकर विभागाने अनिल अंबानींना 8 ऑगस्ट रोजी नोटीस पाठवली होती. ज्याला अंबानींनी हायकोर्टात आव्हान दिले ज्यावर आज सुनावणी होईल.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा : ( Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्राने अकोला जिल्ह्यात प्रवेश केला आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर येथील साईबाबा जिनिंग फॅक्टरी येथे बुधवारी राहुल गांधींच्या यात्रेचा मुक्काम होणार आहे. आज सकाळी पातूरातून पदयात्रेला सुरूवात होणार आहे. यासोबतच 17 नोव्हेंबरला राहुल गांधी यांचा मुक्काम बाळापुर तालुक्यातील बाग फाटा येथे असेल. राहुल गांधींच्या पदयात्रेच्या मार्गावरील सर्व ठिकाणी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. अकोला जिल्ह्यात राहुल गांधींची यात्रा पातुर, देऊळगाव, वाडेगाव, बागफाटा, बाळापूर या मार्गे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला जाणार आहे.

मुख्यमंत्री ईडी कार्यालयात जाणार का? : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. झारखंडमधील राजकीय वातावरण तापले आहे. यूपीएच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सकाळी घरी बोलवले आहे. मागील काही दिवसांपासून सोरेन यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात येत आहे, मात्र ते ईडी कार्यलायत उपस्थित राहिले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.