ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे, काय होणार? आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर - Top News Today

आज दिवसभरात कोठे, काय होणार? देशभरसह राज्यतील महत्त्वाच्या बातम्यांचा अढावा वाचा ( Read Important Top News Today ) एक क्लिकवर. ( Top News Today )

Top News Today
महत्त्वाच्या बातम्यांचा अढावा
author img

By

Published : Nov 15, 2022, 7:12 AM IST

मुंबई : आज दिवसभरात कोठे, काय होणार? देशभरसह राज्यतील महत्त्वाच्या बातम्यांचा अढावा वाचा ( Read Important Top News Today ) एक क्लिकवर. ( Top News Today )

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर : ( Governor Bhagat Singh Koshyari Nashik Tour ) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी एकाच व्यासपीठावर असणार आहेत. आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. तर दुपारी 3 वाजता आदिवासी जनजातीय दिवस आणि राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. बिरसा मुंडा यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी केले आहे.
  • शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी : धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. काल कोर्टानं दोन्ही बाजूंना त्यांची बाजू लिखित स्वरूपात मांडण्याचे आदेश दिले होते. आज यावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
  • राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची आज विदर्भात एंट्री : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची आज सकाळी 7.30 वाजता विदर्भ एन्ट्री होणार आहे.
  • राम कदमांचे घाटकोपर येथे आंदोलन : दिल्लीतील श्रद्धाचा मर्डर लव्ह जिहादचा प्रकार होता का याची चौकशी करावी अशी मागणी राम कदमांनी दिल्ली पोलिसांकडे केली आहे. याबाबत आज राम कदम घाटकोपर येथे आंदोलन करणार आहेत.
  • आपच्या प्रीती शर्मा मेनन यांची पत्रकार परिषद : धारावी पुनर्विकासाबाबत राज्यसरकारच्या घोटाळ्याचा आप पर्दाफाश करणार. धारावी पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्ष रेंगाळत आहे. याबाबत राज्यसरकारच्या ध्येय आणि धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठीं आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन पत्रकार परिषद घेणार आहेत.
  • सुषमा अंधारे यांची कोल्हापुरातील कुरुंदवाडमध्ये सभा : शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड या ठिकाणी सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून गेलेले खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघांमध्ये ही सभा होणार आहे.
  • विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रकार परिषद : राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.