ETV Bharat / bharat

Top News Today : एका क्लिकवर वाचा, दिवसभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी - PM Modi

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) घेवू. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या (Read Important top news) बातम्या वाचा.

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Oct 22, 2022, 7:33 AM IST

मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. दिवाळीचा दुसरा दिवस,मोदींच्या हस्ते बेरोजगारांना नोकरीचं नियुक्तीपत्र , मिनी ट्रेनची सुरवात या घटना दिवसभरात महत्त्वाच्या असणार आहेत.

आज मोदींच्या हस्तेबेरोजगारांना नोकरीचं नियुक्तीपत्र (PM Modi) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये रोजगार मेळ्याचा शुभारंभ होणार आहे. केंद्र सरकारनं 10 लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. आज देशातील पहिल्या टप्प्यात 75 हजार बेरोजगारांना आज नोकरींचं नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. नागपुरातही रेल्वेच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात 200 तरुणांना रेल्वे आणि केंद्र सरकारच्या इतर विभागात संदर्भात नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.

आज दिवाळीचा दुसरा दिवस (Diwali 2022) - धनत्रयोदशी : संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी द्वादशी संपून त्रयोदशी सुरू होणार आहे. या दिवशी प्रदोषकाळ संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सुरू होणार असून रात्री 8 वाजून 37 मिनिटांचा आहे. या काळात म्हणजे प्रदोषकाळात त्रयोदशी आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणामध्ये 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.

आजपासून माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिस पुन्हा सुरू(Mini Train Service) : आजपासून माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिस पुन्हा सुरू होत आहे. नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिसला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदिल दाखवला आहे. नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ऑगस्ट 2019 पासून बंद होती. नेरळ ते माथेरान दोन आणि माथेरान ते नेरळ दोन अशा एकूण चार फेऱ्या दिवसभरात चालणार आहेत .

आज धनतेरस पुजेचा मुहूर्त (Dhanteras 2022) : आज प्रदोषकाळ संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटं ते 8 वाजून 40 मिनिटं असा असणार आहे. धनसंपत्तीची देवता असणार्‍या लक्ष्मी मातेची आणि कुबेराची पूजा केली जाते. यामध्ये जर या दोघांची मूर्ती नसेल तर दोन सुपार्‍या ठेवून देखील प्रतिकात्मक पूजा केली जाते. त्यांच्यासमोर दिवा लावून नैवेद्याला गोडाचा पदार्थ, दूध-साखर/ खीर असे पदार्थ नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.