मुंबई : क्रिप्टोकरन्सीला अंतरजालीय चलन असेही म्हणतात. बिटकॉईन हे एक क्रिप्टोकरन्सीचे उत्तम उदाहरण (Cryptocurrency Prices Today in India) आहे. क्रिप्टो चलनांमध्ये क्रिप्टोग्राफी वापरली जाते. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. ही एक इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो.
व्यवहार गोपनीय : आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साह्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किवा कंपनीची मक्तेदारी ( Cryptocurrency Prices 16 December 2022 ) नाही.
क्रिप्टोकरन्सी दर : आज बीटकॉइनची किंमत 14,42,522 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,05,457 रूपये आहे. बायनान्सची किंमत 21,645 रूपये आहे.