ETV Bharat / bharat

नितीश कुमारांच्या भावनिक अस्त्रांवर विरोधकांची टीका, वाचा कोण काय म्हणाले... - बिहार विधानसभा निवडणूक लेटेस्ट न्यूज

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हटले. त्यावरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली. एनडीएने पराभव पत्करला असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे.

रणदीपसिंग सुरजेवाला
रणदीपसिंग सुरजेवाला
author img

By

Published : Nov 5, 2020, 7:25 PM IST

पाटणा - बिहार विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बिहारी जनतेला भावनिक साद घातली. 'ही माझी शेवटची निवडणूक आहे', असे भावनिक आवाहन नितीश यांनी केले आहे. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून एनडीएने पराभव पत्करला असल्याचे म्हटले आहे.

नितिश कुमार हे मला मोठ्या भावासारखे, त्यांनी मला पाठिंबा द्यावा...

एनडीएने पराभव स्वीकारला -

आज आपली शेवटची निवडणूक असल्याचे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नितीशकुमार यांनी ज्या प्रकारे विधान केले. त्यावरून बिहारमधील भाजपा-जेडीयू आघाडीने पराभव स्वीकारला हे स्पष्ट झाले. आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहोत, की बिहारमधील जनतेला बदल हवा आहे. बिहारमध्ये एक महायुती सरकार स्थापन होईल, हे त्यांनी निश्चितपणे स्वीकारले आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले

आम्हाला आशीर्वाद द्या -

वयाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचे नितीशकुमार यांनी स्वीकारले आहे. ते आता नक्कीच थकले आहेत. नितीश कुमार हे मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी मला धाकटा भाऊ म्हणून आशीर्वाद द्यावा, अशी माझी इच्छा आहे, असे आरएलएसपीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह म्हणाले.

विरोधी पक्षाचा जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न -

बिहारमध्ये एनडीए मजबूत बहुमताने विजयी होईल आणि बिहारमध्ये एनडीए किमान 210 जागा जिंकेल. बिहारमधील जनतेचा नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. म्हणूनच जनता एनडीएच्या बाजूने आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले. विरोधी पक्ष जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षातील लोक कुठेतरी अशा वक्तव्यावर संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नितीशकुमार यांनी 15 वर्षे बिहारची सेवा केली आहे. त्यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास झाला आहे, असेही ते म्हणाले.

नितिश कुमार विश्वासहार्य नाही -

यापूर्वीही भाजपाबरोबर जाणार नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, एनवेळी त्यांनी भाजपाचा हात धरला. म्हणूनच त्यांनी लोकांचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे, असे राजदचे प्रवक्ता मृत्युंजय तिवारी म्हणाले.

काय म्हणाले नितीश कुमार?

'निवडणूक प्रचाराचा आज शेवट होणार आहे. परवा मतदान होत आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला', अशा शब्दांत नितीश यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे.नितीश यांनी १९७७ साली आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी नालंदाच्या हरनौत येथून राजकारणात प्रवेश केला होता. नितीश यांनी या मतदारसंघातून चारवेळा निवडणूक लढवली होती. यात त्यांना १९७७ आणि १९८० साली पराभव स्वीकारावा लागला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.