ETV Bharat / bharat

Four Year Old Child Raped: स्मार्टफोनवर अश्लील व्हिडीओ पाहून १२ वर्षीय मुलाचा ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार - 12 वर्षांच्या मुलाने केला बलात्कार

आजच्या काळात लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन देणे किती धोकादायक आहे याचा पुरावा बिहारच्या सीतामढीमध्ये पाहायला मिळाला. येथे एका 12 वर्षाच्या मुलाने 'ब्लू फिल्म' बघून 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. आता आरोपी मुलाला पकडून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 23, 2023, 4:53 PM IST

सीतामढी (बिहार): बिहारच्या सीतामढीमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाने स्मार्टफोनवर ब्ल्यू फिल्म्स पाहून अत्यंत घृणास्पद कृत्य केले. आरोपी मुलालाल अटक करून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात आहेत. सध्या ४ वर्षीय पीडित मुलगी रुग्णालयात दाखल आहे. मेडिकल चाचणीनंतर कोर्टात जबाब नोंदवला जाईल. या घटनेनंतर परिसरातील लोक हादरले आहेत. हा प्रकार आजकालच्या पालकांना विचार करायला लावणारा आहे.

खेळत असताना मुलीवर बलात्कार : नानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. २१ फेब्रुवारीला इयत्ता सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाने बाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी ही तिच्या आजीच्या घरी गेली होती. रक्तबंबाळ अवस्थेत तिने तिच्या कुटुंबीयांना आपला त्रास सांगितला तेव्हा सर्वजण अस्वस्थ झाले. यानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर आजीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली : तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. घाईगडबडीत पोलिसांनी आरोपी मुलाला सोबत नेले. तेथून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. 12 वर्षीय आरोपी मुलाने बलात्कारात आपला सहभाग मान्य केला आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून ब्लू फिल्म पाहिल्यानंतर हे कृत्य केल्याचे सांगितले. आरोपी अल्पवयीन मुलाला त्याच्या घरातून पकडून चौकशी करण्यात आली. त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पीडितेच्या आजीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेचा जबाब कोर्टात नोंदवला जाईल, असे नानपूर पोलिस ठाण्याचे प्रमुख राकेश रंजन झा यांनी सांगितले.

तीन जणांवर केले आरोप: याप्रकरणी पीडितेच्या आजीने अल्पवयीन मुलासह तीन जणांवर आरोप केले आहेत. नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, गेल्या २१ फेब्रुवारीला त्यांची नात तिच्या घरातून खेळायला गेली होती. काही वेळाने ती रडतच परतली. ती रक्ताने माखलेली होती. तिला विचारले असता तिने सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी मुलीच्या घरच्यांनी आरोपीच्या घरी जाऊन तक्रार केली असता सर्वांनी मिळून त्यांना मारहाण केली.

ब्लू फिल्म पाहून केले घाणेरडे काम : पोलिसांच्या चौकशीत आरोपी अल्पवयीन मुलाने मोबाईलवर ब्लू फिल्म पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने हे घृणास्पद कृत्य केले. रक्ताच्या थारोळ्यात पडून पीडितेने आरडाओरडा सुरू केल्यावर तो पळून गेला. मात्र, बलात्कार म्हणजे काय हे माहीत नसल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले.

हेही वाचा: Violent Protest In Amritsar: अमृतसरमध्ये हिंसक निदर्शने.. पोलीस ठाण्याचाच घेतला ताबा.. अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.