ETV Bharat / bharat

Notice Against Rahul Gandhi : अमित शाहांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, राहुल गांधी यांना न्यायालयाची नोटीस - राहुल गांधी यांना रांची न्यायालयाने नोटीस पाठवली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यामुळे राहुल गांधी यांच्यावर रांची न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र राहुल गांधी उपस्थित न राहिल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयाने नोटीस जारी केली आहे.

Notice Against Rahul Gandhi
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 21, 2023, 9:36 PM IST

रांची - काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना रांची न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. रांची दिवाणी न्यायालयाच्या न्यायमुर्ती अनामिका किस्कू यांच्या न्यायालयाने ही नोटीस राहुल गांधी यांना पाठवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. याबाबत नवीन झा यांनी तक्रार दाखल केली होती.

वकील वकील विनोद साहू

अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य : राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर 2018 मध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर नवीन झा यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. नवीन झा यांच्या वकिलांनी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याची माहिती दिली. मात्र तरीही ते हजर झाले नसल्याचे सांगितेल. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. हे फौजदारी प्रकरण असल्याने राहुल गांधींना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार असल्याचेही वकील वकील विनोद साहू यांनी सांगितले. हा खटला रद्द करण्याबाबत राहुल गांधी यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी मागावी माफी : तक्रारदार नवीन झा यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली. राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा त्यांनी आरोप केला. त्यामुळे राहुल गांधी यांनी माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाकडून नोटीस जारी झाल्यानंतर राहुल गांधींच्या वतीने झारखंड उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र त्यावर अद्याप सुनावणी झाली नाही.

खुन्याला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारू शकत नाही : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावर नवीन झा यांनी आक्षेप घेतला होता. काँग्रेसमध्ये खुनी व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. खुन्याला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारू शकत नाही, ते फक्त भाजपमध्येच शक्य असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते.

राहुल गांधींची अमित शाह आणि पंतप्रधानांवर टीका : काँग्रेसचे नेते तथा वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यामुळे राहुल गांधीवर रांच्याच्या न्यायालयात फोजदारी खटला दाखल करण्यात आला होता. मात्र त्याच्या तारखेवर राहुल गांधी हजर झाले नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.