ETV Bharat / bharat

Rana Couple In Delhi : मुख्यमंत्र्यांनी ओवेसीचे दात पाडून दाखवावे; नवनीत राणांची टीका

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करत ठाकरे सरकारपासून मुक्तीसाठी महाआरती करणार ( Rana Couple Recite Hanuman Chalisa ) आहेत.

Rana Couple
Rana Couple
author img

By

Published : May 14, 2022, 10:10 AM IST

Updated : May 14, 2022, 11:04 AM IST

दिल्ली - अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ( 14 मे ) ते दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करत ठाकरे सरकारपासून मुक्तीसाठी महाआरती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, जामीनावर सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्याने थेट दिल्ली गाठली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्याने दिल्लीतच मुक्काम ठोकला ( Rana Couple Recite Hanuman Chalisa ) आहे.

मुख्यमंत्र्यावर टीका - आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसी मैदानात सभा आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. पठण झाल्यानंतर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे संकट दूर व्हावे म्हणून आज आरती केली. जिथे जिथे केंद्र सरकारचे राज्य आहेत तिथे धर्माचा प्रचार प्रसार केला जाणार आहे. उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व नकली आहे. त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. हिंमत असेल तर, मुख्यमंत्र्यांनी ओवेसीचे दात पाडून दाखवावे, अशी टीका नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. तर, मुख्यमंत्री आजच्या सभेची सुरुवात औरंगजेबचे नाव घेऊन करणार का?, असा सवाल रवी राणांनी उपस्थित केला आहे.

राणा दाम्पत्याने केले हनुमान चालीसाचे पठण

राणा दाम्पत्याला अटक - खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी ते मुंबईत दाखल झाले होते. तर, दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेंनतर शिवसेना समर्थक चांगले आक्रमक झाले. त्यांनी राणांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली. मात्र, त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

हेही वाचा - 'जमलेल्या माझ्या तमाम..', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज मुंबईत सभा.. विरोधकांचा घेणार समाचार

Last Updated : May 14, 2022, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.