ETV Bharat / bharat

भाजपाच्या नेत्यांने दीदींना पाठवली रामायणाची प्रत - मुख्यमंत्री ममता ब‌ॅनर्जी यांच्यावर टीका

शनिवारी कोलकातामध्ये एका कार्यक्रमात 'जय श्री राम'च्या घोषणानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आणि आमदार रामेश्वर शर्मा यांनी ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे.

रामेश्वर शर्मा
रामेश्वर शर्मा
author img

By

Published : Jan 24, 2021, 4:54 PM IST

नवी दिल्ली - मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आणि आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. यासंदर्भात त्यांनी टि्वटरद्वारे माहिती दिली. शनिवारी कोलकातामध्ये एका कार्यक्रमात 'जय श्री राम'च्या घोषणानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला होता. यावरून त्यांच्यावर अनेक विरोधकांनी टीका केली आहे.

मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची प्रत पाठवली आहे. ममता दीदी रामायणाचे वाचन करतील आणि प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील, अशी अपेक्षा आहे. तसेच इथून पुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत, असे रामेश्वर शर्मा यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

रामाचा विरोध करणं थांबवा आणि जय श्री राम म्हणणं शिका, अशी माझी दीदींना प्रार्थना आहे. पश्चिम बंगालमध्ये काल एका कार्यक्रमात तुम्ही श्री राम यांचा अपमान केला. हा अपमान फक्त प्रभू राम यांचा नसून बंगालमधील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे, असे ते म्हणाले. तसेच मी तुम्हाला रामायणाची प्रत पाठवत आहे. तुम्ही ही प्रत वाचाल आणि रामाचा विरोध करणं थांबवाल. त्यानंतर तुम्हीही अभिमानाने जय श्री राम म्हणालं, असे ते म्हणाले. तुम्ही भारताच्या एका प्रांताचे मुख्यमंत्री आहात. रामाचा द्वेष करु नका. कारण रामचा द्वेष करणे महागात पडेल. रावणाने रामाचा द्वेष केला आणि तो संपला, असेही ते म्हणाले.

काय प्रकरण?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारकडून कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दाखल झाले. त्यांच्यासमवेत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या. यावेळी, ममतांना भाषणासाठी बोलावले असता तेथे उपस्थित लोकांनी पीएम मोदींसमोर जय श्री रामचा जयघोष करण्यास सुरवात केली. यावर बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी संतप्त होऊन या कार्यक्रमात बोलण्यास नकार दिला. तसेच घोषणा देणाऱ्या सुनावलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.