ETV Bharat / bharat

बाबा रामदेव यांचा 'यू-टर्न', कोरोना लस टोचून घेणार!

योगगुरू बाबा रामदेव कोरोना विषाणूची लस टोचवून घेणार आहेत. यासह रामदेव यांनी इतर लोकांनाही कोरोना लस घ्यावी, असे आवाहन केले आहे.

author img

By

Published : Jun 10, 2021, 9:11 PM IST

बाबा रामदेव
बाबा रामदेव

नवी दिल्ली - अ‍ॅलोपॅथीवर भाष्य केल्यानंतर वादात सापडलेले योगगुरू बाबा रामदेव कोरोना विषाणूची लस टोचवून घेणार आहेत. यासह रामदेव यांनी इतर लोकांनाही कोरोना लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. योग आणि आयुर्वेदाबरोबरच लोकांनी कोरोना विषाणूची लसदेखील घ्यावी, असे ते म्हणाले. योगगुरू रामदेव यांनी पंतप्रधान मोदींच्या देशभरात मोफत लसीकरण मोहिमेचे कौतुक केले.

बाबा रामदेव यांचा 'यू-टर्न'

रामदेव यांनी आपल्या मागील वक्तव्यांवरून यू टर्न घेतला आहे. यापूर्वी त्यांनी लसीवर प्रश्न उपस्थित केले होते.अॅलोपॅथीमुळे अनेक कोरोना रुग्णांचे प्राण गमावले आहेत. लस घेतल्यानंतरही अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे, असे ते म्हणाले होते. तसेच योग आणि आयुर्वेदाचा डबल डोस घेत असल्याने कोरोना लस घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. योग आणि आयुर्वेदाचा चिलखत आहे आणि कोरोना विषाणू त्याचे काहीही करू शकत नाही, असाही दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आता त्यांनी कोरोना लस घेण्याचा निर्णय का घेतला, हे स्पष्ट नाही.

डॉक्टर हे देवदूत...

रामदेव यांनी डॉक्टरांना देवदूत म्हणून संबोधले. डॉक्टरांशी माझे कोणताही भांडण नाही. डॉक्टर हे पृथ्वीसाठी वरदान आहेत. माझा लढा डॉक्टरांविरूद्ध नाही किंवा अ‍ॅलोपॅथीविरोधात नाही. तर ड्रग माफियाविरूद्ध आहे, असे ते म्हणाले.

ड्रग माफियापासून लोकांची सुटका व्हावी -

आपत्कालीन घटनांमध्ये अ‍ॅलोपॅथी आणि शस्त्रक्रिया अधिक चांगली आहे, यात काही शंका नाही. मात्र, ड्रग्सच्या नावाखाली कोणाला त्रास होऊ नये आणि ड्रग माफियापासून लोकांची सुटका व्हावी, अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

रामदेव बाबा यांचे वादग्रस्त विधान -

रामदेव बाबा यांनी अ‌ॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटले होते. अ‌ॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. यावर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, पुन्हा वादाला तोंड फोडत त्यांनी टि्वट केले आणि आयएमएला 25 प्रश्न विचारले होते. त्यानंतर वाद आणखी वाढला. आयएमएने रामदेव बाबांवर थेट देशद्रोहाचा खटला दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली. तर दुसरीकडे आयएमएच्या उत्तराखंड शाखेने रामदेव बाबाविरोधात 1 हजार कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. सध्या एकाबाजूला रामदेव बाबा तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर असे चित्र आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.