ETV Bharat / bharat

अॅलॉपॅथीवरून देशभरात गुन्हे दाखल झाल्याने रामदेव बाबांची सर्वोच्च न्यायालायत धाव - रामदेव बाबा सर्वोच्च न्यायालयात

रामदेव यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर संतप्त झालेल्या आयएमएच्या अध्यक्षांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. छत्तीसगड येथील रायपूरमध्ये पोलिसांनी आयएमएच्या तक्रारीवरून रामदेव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Ramdev Baba
रामदेव बाबा
author img

By

Published : Jun 23, 2021, 5:55 PM IST

नवी दिल्ली - अॅलोपॅथीवर वादग्रस्त विधान केल्याने अडचणीत सापडलेल्या रामदेव बाबांनी कायदेशीर लढाईसाठी पाऊल टाकले आहे. योगगुरू रामदेव यांनी अॅलोपॅथीवर वादग्रस्त विधान केल्यानंत त्यांच्याविरोधात देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याविरोधात रामदेव बाबा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने पाटणा, रायपूर या ठिकाणी तक्रारी दिल्यानंतर रामदेव बाबा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सर्व दाखल झालेले गुन्हे एकत्रित करून त्यावरील पुढील प्रक्रियेवर स्थगिती करावी, अशी त्यांनी याचिकेत विनंती केली आहे.

हेही वाचा-चिंताजनक! देशावर 'डेल्टा प्लस' कोरोनाचं संकट; आढळले 40 रुग्ण

रामदेव यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर संतप्त झालेल्या आयएमएच्या अध्यक्षांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. छत्तीसगड येथील रायपूरमध्ये पोलिसांनी आयएमएच्या तक्रारीवरून रामदेव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोरोनावरील उपचाराबाबत चुकीची माहिती रामदेव यांनी पसरवित असल्याचे आयएमएने तक्रारीत म्हटले होते. रामदेव हे समाज माध्यमातही केंद्र सरकार व आयसीएमआरकडून वापरल्या जाणाऱ्या उपचाराबाबत रामदेव चुकीची माहिती पसरवित असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा-मी तुम्हाला सांगतो, या टीव्हीवाल्यांना शाप लागेल'; तेलंगणाचे मुख्यमंत्री माध्यमांवर भडकले

रामदेव बाबा यांचे हे होते वादग्रस्त विधान -

रामदेव बाबा यांनी अ‌ॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटले होते. अ‌ॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. ही उपचारपद्धती म्हणजे मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. कोरोनावर उपचारामध्ये हायड्रोक्लोरिक्विन फेल झालं. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अ‌ॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अ‌ॅलोपॅथी उपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अ‌ॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे, असे ते म्हणाले होते. यावर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी टि्वट करत आयएमएला २५ प्रश्न विचारले होते. त्याच रामदेव बाबांचा आणखी एक डॉक्टरांची 'टर' उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.